घरमहाराष्ट्रपुणेराष्ट्रवादी फुटीनंतर पहिलीच दिवाळी; अजितदादा पवार कुटुंबीयांसोबत गोविंद बागेत राहणार उपस्थित?

राष्ट्रवादी फुटीनंतर पहिलीच दिवाळी; अजितदादा पवार कुटुंबीयांसोबत गोविंद बागेत राहणार उपस्थित?

Subscribe

पुणे : दिवाळी पाडव्याला पवार कुटुंबीय दरवर्षी एकत्र येतात. दिवाळीचा पाडवा आणि बारामतीमधील गोविंदबाग हे समीकरण अनेक वर्षांपासून ठरलेले आहे. परंतु यंदा अजित पवार यांनी जुलै महिन्यात बंड पुकार शरद पवार यांच्या विरोधी भूमिका घेतली आहे. त्यांनी शिंदे-फडणवीस यांना साथ देत सत्तेत सहभागी झाले आहेत. यानंतर गेल्या चार महिन्यांत पवार कुटुंबीयात आरोप-प्रत्यरोप सुरू आहेत. अशातच आता दिवाळी सण आला आहे आणि या दिवाळीत बारामीत येथील गोविंद बागेत पवार कुटुंबीयांची एकत्र येण्याच्या परंपरेत खंड पडणार आहे. परंतु या मागचे कारण काही वेगळेच आहे. अजित पवार यांनी एक पत्रक प्रसिद्ध करत याबाबत माहिती दिली आहे. (First Diwali after Nationalist split Will Ajit Pawar be present in Govind Bagh with his family)

हेही वाचा – फडणवीसांपेक्षा आदित्य ठाकरेंमध्ये जास्त ‘टॅलेंट’; व्हायरल व्हिडीओ प्रकरणी राणेंचा राऊतांना टोला

- Advertisement -

अजित पवारांनी पत्रकात म्हटले की, गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे. आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळुहळु सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरे होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा तसेच मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजाने दूर रहावे लागणे हे त्रासदायक असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा  – त्यांचे खबरी त्यांना अडचणीत आणतील; राऊतांच्या ‘त्या’ शब्दावर शिंदे गटाचे जोरदार प्रत्युत्तर

- Advertisement -

अजित पवार म्हणाले की, दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटत असतो. दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्ताने भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला भेटता येणार नाही. परंतु माझ्या सदिच्छा कायम आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांना, आपल्या कुटुंबियांना, नातेवाईक आणि मित्र परिवाराला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश, धनधान्याची समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो, अशा शब्दात अजित पवार यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. आजारपणामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार असल्याने आणखी काही दिवस जनतेला भेटता येणार नसल्याचे सांगत त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -