घरफोटोगॅलरीनाताळ सणासाठी मुंबई सज्ज; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

नाताळ सणासाठी मुंबई सज्ज; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

Subscribe

ख्रिश्चन धर्मीयांचा पवित्र सण असणाऱ्या नाताळ सणाला आता जेमतेम 10 दिवस उरले आहेत. कोरोना महामारीचा प्रकोप ओसरल्याने महाराष्ट्रात प्रत्येक सण-उत्सव धडाक्यात साजरा होत आहे. आता नाताळचा उत्साह देखील पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक दुकाने सजली असून ख्रिसमस ट्री, रंगीबेरंगी पताका यासह सांताक्लॉजचे कपडे आणि वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. कोणत्याही सणावरासाठी वैविध्यपूर्ण वस्तू मिळण्याचे हमखास ठिकाण म्हणजे क्रॉफर्ड मार्केट.

 

- Advertisement -

नाताळ म्हणजे ख्रिसमस ट्री. क्रॉफर्ड मार्केटमध्ये विविध प्रकारचे ख्रिसमस ट्री पाहायला मिळतात.

- Advertisement -

 आकर्षक भेटवस्तू आणि जिंगल बेल्स यांनी बाजारपेठ सजली आहे.

चांदणीच्या आकाराचे कंदिलही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -