घरफोटोगॅलरीPHOTO : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात सहकुटुंब केली विठुमाऊलीची महापूजा

PHOTO : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात सहकुटुंब केली विठुमाऊलीची महापूजा

Subscribe

पंढरपूर : यंदा आषाढी वारीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता शिंदे हस्ते करण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश तसेच मंत्रिमंडळातील मंत्री आणि शिंदे गटातील आमदार उपस्थित होते.

- Advertisement -

मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्यासह मानाचे वारकरी दाम्पत्य भाऊसाहेब मोहिनीराज काळे व मंगल भाऊसाहेब काळे यांना विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्याचा मान मिळाला. महापूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने आयोजित मानाच्या वारकऱ्यांच्या सत्कार करण्यात आला.

- Advertisement -

यावेळी महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनीकर्ममंत्री दादाजी भुसे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.

बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्याच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम, सुफलाम होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत, असे साकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी शासकीय महापूजेवेळी विठूरायाच्या चरणी घातले.

आषाढी वारीत लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनास आले आहेत. पंढरी व परिसर अवघा पांडुरंगमय झाला आहे. आषाढी वारीत वारकऱ्यांच्या आरोग्याला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यासाठी तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातून भाविकांची आरोग्य सेवा करणे विठ्ठल पुजेसारखेच आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -