घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रBaramati Constituency : आमच्या डोक्यात प्रकाश पडायला १७ वर्षे लागली, अजित पवारांचे...

Baramati Constituency : आमच्या डोक्यात प्रकाश पडायला १७ वर्षे लागली, अजित पवारांचे सुप्रिया सुळेंना उत्तर

Subscribe

ही निवडणूक भावनिक मुद्दयांवर लढविण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात येतो आहे. तर भावनिकतेपेक्षा देशाचा विचार करा, देशासाठी खंबीर नेतृत्व हवे आहे आणि ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच देऊ शकतात, असा प्रचार अजित पवार यांच्या गटाकडून केला जातो आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामतीच्या सध्याच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यातील शा‍ब्दिक चकमक रोज नवे वळण घेते आहे. दोघांकडून एकमेकांना टोकदारपणे उत्तरे दिली जात आहेत. याचीच प्रचिती पुन्हा एकदा बुधवारी पुण्यात आली. मी जर अयोग्य होते तर १७ वर्षे आमच्यासोबत का काढली, तेव्हा गप्प का बसले, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला होता. त्याला अजित पवार यांनी आपल्या स्टाईलने उत्तर दिले. आमच्या डोक्यात प्रकाश पडायला १७ वर्षे लागली, काय म्हणणंय तुझं?, असा सवाल त्यांनी हा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना विचारला आणि सुप्रिया सुळेंना उत्तरही दिले.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही गटातील नेते लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक गढ असलेल्या बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे संपूर्ण देशात या मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. दोन्ही पक्षांकडून आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रणनिती आखण्यात येते आहे. ही निवडणूक भावनिक मुद्दयांवर लढविण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात येतो आहे. तर भावनिकतेपेक्षा देशाचा विचार करा, देशासाठी खंबीर नेतृत्व हवे आहे आणि ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच देऊ शकतात, असा प्रचार अजित पवार यांच्या गटाकडून केला जातो आहे.

- Advertisement -

तुम्हीच सांगा मोदी जी शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला? पवारांच्या आमदाराने थेट पंतप्रधानांना केला सवाल

पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी बुधवारी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाचे कौतुक केले. ते म्हणाले, ही देशाची निवडणूक आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी देशाचा विचार केला पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्यावर गेल्या १० वर्षात एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. ते धडाडीने निर्णय घेतात. त्यामुळेच विरोधक अस्वस्थ आहेत आणि त्यांनी आता एकत्र येऊन मोट बांधली आहे.

- Advertisement -

सुनेत्रा पवार मंत्री होणार का?

सुनेत्रा पवार या निवडून आल्यावर केंद्रीय मंत्री होतील, असा उल्लेख एका सभेत करण्यात आला होता. त्याचा धागा पकडून विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, काही वेळा प्रेमापोटी काही जण बोलून जातात. पण त्याला अर्थ नसतो. देशाचे पंतप्रधान किंवा राज्यांचे मुख्यमंत्री हे त्यांचे मंत्रिमंडळ ठरवत असतात. जर पंतप्रधान या संदर्भात काही बोलले असते. तर त्याला अर्थ होता.

कद्दावर नेता म्हणत मोदींचा पवारांवर निशाणा; 10 वर्षातील कामाची माढ्यात केली उजळणी

भरपूर जागा येतील

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणुकीत किती जागा येतील, यावर उत्तर देताना भरपूर जागा येतील, एवढेच सूचक विधान अजित पवार यांनी यावेळी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -