घररायगडमोबाईल एअर मॉनिटरिंग सिस्टम व्हॅन महाड औद्योगिक वसाहतीत दाखल

मोबाईल एअर मॉनिटरिंग सिस्टम व्हॅन महाड औद्योगिक वसाहतीत दाखल

Subscribe

औद्योगिक क्षेत्रामध्ये हवेतील घटक मोजण्यासाठी एअर मॉनिटरिंग सिस्टमचा वापर केला जातो गेली अनेक वर्षापासून ही यंत्रणा महाडमध्ये कार्यरत आहे मात्र ही यंत्रणा एकाच जागी स्थिर ठेवण्यात आली होती. महाड औद्योगिक क्षेत्रातील हवेतील प्रदूषणाबाबत सातत्याने तक्रारी होत असल्याने यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यात वितरित केलेल्या मोबाईल एअर मॉनिटरिंग सिस्टम वाहनांपैकी एक व्हॅन महाड औद्योगिक क्षेत्राला दिली आहे. नुकतीच ही व्हॅन महाड मध्ये दाखल झाली आहे.

महाड: हवेतील गुणवत्ता तपासण्याचे काम करणारी मोबाईल यंत्रणा महाड औद्योगिक वसाहतीत दाखल झाली असून ही सद्या प्रसोल कंपनीच्या परिसरात उभी करण्यात आली आहे.
औद्योगिक क्षेत्रामध्ये हवेतील घटक मोजण्यासाठी एअर मॉनिटरिंग सिस्टमचा वापर केला जातो गेली अनेक वर्षापासून ही यंत्रणा महाडमध्ये कार्यरत आहे मात्र ही यंत्रणा एकाच जागी स्थिर ठेवण्यात आली होती. महाड औद्योगिक क्षेत्रातील हवेतील प्रदूषणाबाबत सातत्याने तक्रारी होत असल्याने यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यात वितरित केलेल्या मोबाईल एअर मॉनिटरिंग सिस्टम वाहनांपैकी एक व्हॅन महाड औद्योगिक क्षेत्राला दिली आहे. नुकतीच ही व्हॅन महाड मध्ये दाखल झाली आहे. या व्हॅनवर हवेतील विषारी घटक त्याचप्रमाणे इतर घनकन मोजण्याची क्षमता असलेली यंत्रणा बसवण्यात आली आहे पूर्णपणे अध्यायावत असलेली ही यंत्रणा कोट्यावधी रुपयांची असल्याने ही यंत्रणा चालवण्यासाठी एजन्सी नियुक्ती केली गेलेली असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
हवेतील हवा गुणवत्ता मोजणारी अशा प्रकारची यंत्रणा महाडमध्ये पहिल्यांदाच दाखल झाली असून प्रसोल कंपनीमध्ये या तपासणी यंत्रणाची प्राथमिक चाचणी सुरू आहे. महाड औद्योगिक क्षेत्रात सातत्याने कंपन्यांकडून प्रदूषण केले जाते याबाबत वारंवार तक्रारी होत आहेत.

प्रदूषणामुळे नागरिक देखील हैराण झाले असून वातावरणात वाढलेल्या प्रदूषणामुळे हवा प्रदूषण होत आहे. हे प्रदूषण मोजनारी यंत्रणा ज्या एजन्सीची या वाहनावर नियुक्ती केली गेलेली आहे त्या एजन्सी मार्फत उपप्रादेशिक कार्यालयाला रिपोर्टिंग केले जाणार आहे. हवेतील विषारी घटकांची माहिती या मोजणीतून समोर येणार आहे. हवेतील गुणवत्ता तपासणी करणारी मोबाईल यंत्रणा व्हॅन महाडमध्ये दोन दिवसापूर्वी दाखल झालेली असून या माध्यमातून हवेची गुणवत्ता तपासणी करण्याचे काम एजन्सी मार्फत सुरू आहे सध्या ही व्हॅन प्रसोल कंपनीच्या आवारात ठेवण्यात आलेली आहे.

- Advertisement -

-इंदिरा गायकवाड,

अधिकारी, उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -