घरक्रीडादिव्या काकरनची सुवर्ण कमाई

दिव्या काकरनची सुवर्ण कमाई

Subscribe

आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा

भारताच्या दिव्या काकरनने गुरुवारी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. आशियाई स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारी दिव्या ही नवज्योत कौरनंतर भारताची केवळ दुसरी महिला कुस्तीपटू आहे. नवज्योतने २०१८ साली किर्गिस्तानमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. दिव्याने यंदाच्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. पाच कुस्तीपटूंचा समावेश असलेल्या ६८ किलो वजनी गटात दिव्याने आपले सर्व सामने जिंकले. तिने ज्युनियर विश्वविजेत्या नारुहा मात्सुयुकीलाही धूळ चारली.

यजमान भारतासाठी गुरुवारचा दिवस अविस्मरणीय ठरला. सरिता मोर (५९ किलो), पिंकी (५५ किलो) आणि निर्मला देवी (५० किलो) यांनी आपापल्या वजनी गटांची अंतिम फेरी गाठली आहे. यंदाच्या स्पर्धेत चीनचे कुस्तीपटू आणि जपानचे सर्वोत्तम कुस्तीपटू खेळले नाहीत. याचा फायदा एशियाडमधील कांस्यपदक विजेत्या दिव्याला झाला. तिने ६८ किलो वजनी गटाच्या पहिल्या सामन्यात कझाकस्तानच्या अल्बिना कैरगेलीनोव्हाचा, तर दुसर्‍या सामन्यात मंगोलियाच्या देलगेर्माचा पराभव केला.

- Advertisement -

तिसर्‍या फेरीत तिने उझबेकिस्तानच्या अझोडा इसबर्गेनोव्हाला अवघ्या २७ सेकंदात पराभूत केले. त्यानंतर ज्युनियर विश्वविजेत्या मात्सुयुकीविरुद्धच्या सामन्याची दमदार सुरूवात करत दिव्याने ४-० अशी आघाडी मिळवली. मात्र, मात्सुयुकीने पुनरागमन करत ४-४ अशी बरोबरी साधली. परंतु, दिव्याने आपला खेळ उंचावत हा सामना जिंकला आणि सुवर्णपदक पटकावले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -