घरक्रीडाCorona in Cricket : T-20 विश्वचषक काही दिवसांवर अन् क्रिकेटमध्ये कोरोनाची एंट्री;...

Corona in Cricket : T-20 विश्वचषक काही दिवसांवर अन् क्रिकेटमध्ये कोरोनाची एंट्री; ‘हा’ खेळाडू बाधित

Subscribe

सध्या टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका सुरू असून, काल गुरुवारी झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने 1.0 अशी आघाडी घेतली आहे. तर तिकडे न्यूझीलंड आणि पाकिस्तानदरम्यान पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे.

नवी दिल्ली : आगामी T-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी सध्या क्रिकेटविश्वात जोरदार तयारी सुरू आहे. काही देशांमध्ये टी-20 मालिका खेळविल्या जात असतानाच याच क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा कोरोनाने एंट्री केली आहे. न्यूझीलंडचा ऑलराऊंडर मिचेल सँटनर याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. (Corona in Cricket T20 World Cup few days and entry of Corona in Cricket This player affected)

सध्या टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका सुरू असून, काल गुरुवारी झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने 1.0 अशी आघाडी घेतली आहे. तर तिकडे न्यूझीलंड आणि पाकिस्तानदरम्यान पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेदरम्यान मात्र, न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे तो न्यूझीलंडचा स्टार ऑलराऊंडर मिचेल सँटनर याची कोरोना चाचणी घेतली असता तो त्यात कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा आढळून आला आङे. यामुळे सॅंटनर यास संघातून बाहेर जावे लागले.

- Advertisement -

क्रिकेट बोर्डाने घेतला हा निर्णय

कोरोना कमी झाल्याच्या मोठ्या काळानंतर एखाद्या क्रिकेटपटूला कोरोना झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. पण याचा सामन्यावर कोणताही परिणाम झाला नाही. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मिचेल सँटनरला पूर्णपणे विश्रांती घेण्याचा आणि घरात राहाण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तान-न्यूझीलंड पहिला टी-20 सामना नियोजित वेळेत खेळवण्यात आला हे विशेष.

हेही वाचा : Rohit Sharma चा मास्टर स्ट्रोक Hardik Pandya वर पडणार भारी? भारताला मिळाला नवा अष्टपैलू

- Advertisement -

पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव

ज्याप्रकारे भारतविरुद्ध अफगाणिस्तान यांच्यांमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका सुरू आहेत. अगदी त्याच प्रकारे न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान याच्यातही टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना आज शुक्रवारी (12 जानेवारी) खेळवण्यात आला. यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 46 धावांना दारूण पराभव केला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तानसमोर 226 धावांचे लक्षं ठेवलं होतं. यासाठी न्यूझीलंड संघाला 8 विकेट्स गमवाव्या लागल्या होत्या. यामध्ये मिचेलने अवघ्या 27 चेंडूत चार चौकर आणि चार षटकार मारत 61 धावा केल्या. तर केन विल्यमन्सने 57 धावा करत त्याला चांगली साथ दिली. तर सलामीच्या फिन अॅलनने 34 धावा केल्या. पाकिस्तानतर्फे शाहिन आफ्रिदी आणि अब्बास आफ्रिदीने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.

हेही वाचा : पंतप्रधानांच्या स्वागतात महाराष्ट्राचे मंत्री Dada Bhuse यांनीही धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल

180 धावांवर अटोपला पाकिस्तानचा डाव

न्यूझीलंडने दिलेल्या 227 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ नाकीनऊ आला. पाकिस्तानचा डाव 180 धावात आटोपला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या बाबर आझमने 57 धावा करत विजयासाठी झूंज दिली. पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. टीम साऊदीने चार विकेट घेत पाकिस्तानचं कंबरड मोडलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -