घरक्रीडाजागतिक कसोटी स्पर्धेत भारत-पाक सामना व्हावा!

जागतिक कसोटी स्पर्धेत भारत-पाक सामना व्हावा!

Subscribe

भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धांमधील सामन्याशिवाय आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा कशी होते हे मला कळत नाही, असे विधान पाकिस्तानचा महान गोलंदाज वकार युनिसने केले. कसोटी क्रिकेटची उत्सुकता वाढावी यासाठी आयसीसीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरु केली. या स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील अव्वल नऊ संघांमध्ये कसोटी सामने होत आहेत. प्रत्येक संघ सहा द्विपक्षीय मालिका खेळणार असून अव्वल दोन संघांत २०२१ साली इंग्लंडमध्ये या स्पर्धेचा अंतिम सामना होईल.

पाकिस्तान आणि भारत यांच्यात संबंध चांगले नाही. ही परिस्थिती अवघड आहे. मात्र, आयसीसीने हस्तक्षेप करुन सामना खेळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सामन्याशिवाय आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा कशी होते हे मला कळत नाही, असे वकार म्हणाला.

- Advertisement -

वकारने आपल्या १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ८७ कसोटी सामने खेळले. मात्र, भारताविरुद्ध त्याला केवळ ४ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. दोन देशांतील परिस्थिती नेहमीच अशी होती. त्यामुळे भारताविरुद्ध केलेले कसोटी पदार्पण मी कधीही विसरू शकत नाही, असे वकारने नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -