घरक्रीडाजे. जे. हॉस्पिटल, देना बँक बाद फेरीत

जे. जे. हॉस्पिटल, देना बँक बाद फेरीत

Subscribe

जे. जे. हॉस्पिटल, देना बँक या संघांनी पुरुषांमध्ये, तर शिवशक्ती, महात्मा गांधी, अनिकेत यांनी महिलांमध्ये शिवनेरी मंडळ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. जे. जे. हॉस्पिटल आणि देना बँक या संघांमध्ये पुरुषांच्या ड गटात अग्रक्रम मिळविण्यासाठी लढत होईल.

पुरुष गटात जे. जे. हॉस्पिटलने आधी महाबँकेचा ४४-२२ असा आणि नंतर ठाणे पोलीस संघाचा ३५-१२ असा पराभव करून बाद फेरी गाठली. मयूर शिवतरकर, मयूर शेट्ये, प्रमोद धुत, बालाजी जाधव यांनी जे. जे. हॉस्पिटलकडून चांगला खेळ केला. देना बँकेने ठाणे पोलिसांवर ५२-२३ अशी मात केली. त्यांच्याकडून नितीन देशमुख, सागर सुर्वे यांनी चांगला खेळ केला. ब गटात सेंट्रल बँकेने मध्य रेल्वे विभागाचा ३९-३५ असा पराभव केला. धनंजय सरोज, अभिजित गुडे, ओमकार मोरे, ओमकार सोनावणे यांनी सेंट्रल बँकेकडून अप्रतिम खेळ केला. मध्य रेल्वेचा हा सलग दुसरा पराभव असल्यामुळे त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या गटातून महिंद्रा आणि सेंट्रल बँकेने बाद फेरीत प्रवेश केला. अ गटात बँक ऑफ इंडियाने न्यू इंडियाचा २८-२२ असा पराभव करत बाद फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या. ’क’ गटात रायगड पोलीसने मुंबई बंदरला ३०-२७ असे नमवत आगेकूच केली.

- Advertisement -

महिलांच्या क गटात पुण्याच्या शिवओमने पहिल्या सामन्यात पालघरच्या श्रीरामाला ३९-१२ असे पराभूत केले, पण नंतर ठाण्याच्या शिवतेजने शिवओमला ३४-२८ असे नमविले. अ गटात पुण्याच्या जागृतीने होतकरूला ४३-२३ असे पराभूत केले. जागृतीकडून ऋतुजा होसमाने, अंजली मुळे यांनी या सामन्यात चांगला खेळ केला. या गटात शिवशक्तीने होतकरूचा ५०-१२ असा धुव्वा उडवला. ऋतुजा बांदिवडेकर, ज्योती डफळे, सोनम भिलारे शिवशक्तीच्या या विजयात चमकल्या. ब गटात महात्मा गांधीने सायली जाधव, तृप्ती सोनावणे, ग्रंथाली हांडे यांच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर स्वराज्यवर ४७-१९अशी मात केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -