घरक्राइमJoginder Sharma : टी-20 वर्ल्डकप विजेत्या गोलंदाजावर गुन्हा दाखल; तरूणाला आत्महत्येस प्रवृत्त...

Joginder Sharma : टी-20 वर्ल्डकप विजेत्या गोलंदाजावर गुन्हा दाखल; तरूणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

Subscribe

हरियाणा : 2007 मध्ये पहिल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शेवटचे षटक टाकताना भारताला विजय मिळवून देणाऱ्या माजी क्रिकेटपटू जोगिंदर शर्मावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. तरुणाच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर जोगिंदर शर्मावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Joginder Sharma T20 World Cup winning bowler booked Accused of inciting the youth to commit suicide)

हिसारमधील आझाद नगर पोलीस ठाण्यात जोगिंदर शर्मासह सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हिसारमधील डबरा गावातील पवन नावाच्या व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जोगिंदर शर्मावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिसारच्या आझाद नगर पोलीस स्टेशनचे प्रभारी संदीप कुमार यांनी पवनच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एएसपी राजेश कुमार मोहन यांनी सांगितले की, आरोपींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, एससी-एसटी कलम जोडून तपासानंतर कारवाई केली जाईल. यावेळी त्यांनी असेही सांगितेल की, पूर्वीच्या प्रकरणाशी संबंधित प्रकरणाची पुन्हा चौकशी केली जाईल.

- Advertisement -

हेही वाचा – Blood Bank : “रक्त विकण्यासाठी नाही…,” रक्तपेढ्या आता फक्त प्रक्रिया शुल्क आकारणार; DCGI च्या सूचना

काय आहे प्रकरण?

पाबडा गावातील सुनीता यांनी 2 जानेवारी रोजी आझाद नगर पोलीस ठाण्यात अजयवीर, ईश्वर प्रेम, राजेंद्र सिहाग व इतरांसोबत तिच्या घराबाबत न्यायालयात खटला सुरू असल्याची नोंद केली होती. या प्रकरणामुळे त्यांचा मुलगा पवन अस्वस्थ होता आणि त्याने 1 जानेवारी रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मात्र त्यानंतर पवनच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून माजी क्रिकेटपटू जोगिंदर शर्मा, अजयवीर, ईश्वर प्रेम, राजेंद्र आणि इतर दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच पवनच्या आईने या सहाजणांवर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय पवनच्या कुटुंबियांना रात्री उशिरापर्यंत आंदोलन केले.

- Advertisement -

एएसपीकडून चौकशी करण्याचे आश्वासन

डीएसपी अशोक कुमार यांनी आंदोलन करणाऱ्या पवनच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी कुटुंबियांना सांगितले की, जर तुम्ही हिस्सार पोलिसांच्या तपासावर समाधानी नसाल तर तुम्ही हिस्सार विभागात येणाऱ्या अन्य चार जिल्ह्यांतील कोणत्याही अधिकाऱ्याकडून तपास करून घेऊ शकता. मात्र डीएसपीच्या बोलण्यावर कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासंदर्भात एएसपीशीच बोलण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. यानंतर एएसपी डॉ. राजेश मोहन यांनी घटनास्थळी पवनच्या कुटुंबियांची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा – Parliament Security Breach : आरोपींची पॉलिग्राफ, नार्को टेस्ट होणार; ब्रेन मॅपिंगमधून उलगडणार अनेक गुपिते?

मी पवनला ओळखत नाही – जोगिंदर शर्मा

दरम्यान, या प्रकरणावर तत्कालीन डीएसपी जोगिंदर शर्मा म्हणाले की, या प्रकरणाची मला काहीही माहिती नाही. मी पवनला ओळखत नाही आणि त्याला कधी भेटलो नाही. माझ्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात मी खूप तपास केला, पण असे एकही प्रकरण माझ्या निदर्शनास आले नाही, असे जोगिंदर शर्मा यांनी स्पष्ट केले.

कोण आहेत जोगिंदर शर्मा?

जोगिंदरने 2004 मध्ये भारतासाठी वनडे पदार्पण केले आणि 2007 मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. 40 वर्षीय जोगिंदरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ पाच विकेट आहेत. मात्र 2007 च्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जोगिंदरने शेवटच्या षटकात मिसबाह-उल-हकला बाद करून भारताला पहिला टी-20 विश्वचषक जिंकवून दिला होता. यानंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली हरियाणा पोलीसमध्ये डीएसपी पदावर कार्यरत झाला. सध्या तो कालका येथे तैनात आहे. तो रोहतक, हरियाणातून आला असून भारतासाठी 4 एकदिवसीय आणि 4 टी-20 सामने खेळले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -