घरक्रीडामहाराष्ट्राला दुहेरी मुकुट

महाराष्ट्राला दुहेरी मुकुट

Subscribe

राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

महाराष्ट्राच्या मुला-मुलींनी ज्युनियर खो-खो राष्ट्रीय स्पर्धेत सलग सहाव्यांदा दोन्ही गटांचे जेतेपद पटकावले. तसेच ही स्पर्धा जिंकण्याची महाराष्ट्राच्या मुलांची सलग पंधरावी, तर मुलींची सलग सहावी वेळ होती. मुलांमध्ये सर्वोत्तम खेळाडूला मिळणारा वीर अभिमन्यू पुरस्कार महाराष्ट्राच्या दिलीप खांडवीने, तर मुलींमध्ये सर्वोत्तम खेळाडूचा जानकी पुरस्कार महाराष्ट्राच्या जानवी पेठेने पटकावला.

सुरत येथील वीर नर्मदा दक्षिण गुजरात विद्यापीठ क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कोल्हापूरवर १३-१२ असा साडेतीन मिनिटे राखून एका गुणाने पराभव केला. महाराष्ट्राच्या दिलीप खांडवीने १:००, ३:०० मिनिटे संरक्षण आणि चार गडी बाद केले. त्याला सौरभ आहिर (२:००, २:०० मि. संरक्षण आणि १ बळी), रामजी कश्यप (१:३० मि. संरक्षण आणि १ बळी), आदित्य गणपुले (१:००, १:५० मि. संरक्षण आणि २ बळी) यांनी चांगली साथ दिली.

- Advertisement -

मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रने कर्नाटकावर ९-७ असा एक मिनिट चाळीस सेकंद राखून दोन गुणांनी विजय मिळवला. अश्विनी पासिने (२:००, १:२० मि. संरक्षण आणि १ बळी), रेश्मा राठोड (२:२०, ३:२० मि. संरक्षण आणि २ बळी), जान्हवी पेठे (२:००, १:४० मि. संरक्षण), श्वेता वाघ (२:४० मि. संरक्षण आणि २ बळी), रितिका मगदूम (३ बळी) यांनी महाराष्ट्राच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. कर्नाटकच्या बी. चित्राने (३:४०, २:०० मि. संरक्षण) झुंजार खेळ केला, पण तिला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही.

त्याआधी झालेल्या मुलांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राने कर्नाटकचा ९-६ असा, तर कोल्हापूरने आंध्र प्रदेशचा १३-९ असा पराभव केला होता. मुलींच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राने दिल्लीवर १०-८ अशी, तर दुसर्‍या सामन्यात कर्नाटकने गुजरातवर ३-२ अशी मात केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -