घरक्रीडाTable Tennis : बुडापेस्टमधील स्पर्धेत मनिका बात्रा-साथियनला जेतेपद

Table Tennis : बुडापेस्टमधील स्पर्धेत मनिका बात्रा-साथियनला जेतेपद

Subscribe

२०१८ राष्ट्रकुल स्पर्धेनंतर पहिल्यांदाच एकत्र खेळताना या दोघांनी बुडापेस्ट येथे झालेली स्पर्धा जिंकली.

भारताचे मनिका बात्रा आणि जी. साथियन यांनी जागतिक टेबल टेनिसच्या टूर कंडेंडर बुडापेस्ट २०२१ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. मनिका आणि साथियन यांना एकत्र खेळण्याची फारशी संधी मिळत नाही. २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेनंतर पहिल्यांदाच एकत्र खेळताना या दोघांनी बुडापेस्ट येथे झालेली स्पर्धा जिंकली. त्यांनी मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात हंगेरीच्या नांदोर ऐसेकी आणि डोरा मादाराजचा ३-१ असा पराभव केला. मनिका आणि साथियनने या सामन्यातील पहिला गेम ११-९ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये ऐसेकी आणि मादाराजने चांगले पुनरागमन करत ११-९ अशी बाजी मारली. परंतु, मनिका आणि साथियनने तिसरा गेम १२-१० असा, तर चौथा गेम ११-६ अशा फरकाने जिंकला. या सामन्यातील विजयासह त्यांनी मिश्र दुहेरी गटाचे जेतेपद पटकावले.

उपांत्यपूर्व फेरीत अव्वल सीडेड जोडीवर मात

मनिका आणि साथियनने या स्पर्धेत दमदार कामगिरी केली. उपांत्य फेरीत त्यांनी बेलारूसच्या अलेक्झांडर खानिन आणि डारिया ट्रीगोलॉसवर ११-६, ११-५, ११-४ अशी मात केली होती. त्याआधी त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत बारबोरा बालाझोव्हा आणि लुबोमीर पिस्तेज या स्लोव्हाकियाच्या अव्वल सीडेड जोडीला ११-४, ३-११, ६-११, ११-६, ११-९ असा पराभवाचा धक्का दिला होता.

- Advertisement -

मनिका-साथियन एकत्र खेळण्यास उत्सुक

२०२४ सालच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनिका आणि साथियन एकत्र खेळण्यास उत्सुक आहेत. यंदा टोकियोत झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांत मनिकाने शरथ कमलच्या साथीने खेळण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांनी एशियाडमध्ये कांस्यपदक पटकावले होते. परंतु, आता आगामी काळात मनिकाचा साथियनसोबत खेळण्याचा प्रयत्न आहे. साथियन आता चेक ओपन स्पर्धेत खेळणार आहे.


हेही वाचा – राफेल नदाल ‘या’ कारणाने उर्वरित मोसमातून आऊट

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -