घरक्रीडानीलय पट्टेकर दुहेरी यशाच्या उंबरठ्यावर; टेबल टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत

नीलय पट्टेकर दुहेरी यशाच्या उंबरठ्यावर; टेबल टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत

Subscribe

ठाणे : बूस्टर अकॅडमीच्या नीलय पट्टेकरने सहज विजय मिळवत सीकेपी सोशल क्लब आणि सीकेपी ज्ञातीगृह ट्रस्ट आयोजित खेतवानी स्मृती ठाणे जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेतील 13 आणि 15 वर्ष वयोगटाच्या अंतिम लढतीत स्थान मिळवले. (Nilay Pattekar on the brink of double success In the finals of the table tennis tournament)

हेही वाचा – IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ पुण्यात दाखल; चाहत्यांकडून जल्लोषात स्वागत

- Advertisement -

सीकेपी सोशल क्लबच्या सभागृहात सुरु असलेल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत तिसरे मानांकन मिळालेल्या नीलयने दुसऱ्या मानांकित प्रो टेबल टेनिस अकॅडमीच्या एकांश मदनेचे आव्हान सहज परतवून लावले. हा सामना नीलयने 11-3, 11-1 आणि 11-5 अशा फरकाने जिंकला. या गटातील अन्य लढतीत अग्र मानांकित प्रो टेबल टेनिस अकॅडमीच्या प्रतीक तुलसानीने बिगर मानांकित आपला संघ सहकारी अनय गोळेवर 11-3, 11-1 आणि 11-5 असा विजय मिळवला.

हेही वाचा – ENG Vs AFG: ‘…म्हणून आम्ही विजय मिळवला’; अफगाणिस्तानने विजयाचे श्रेय दिलं विराटला

- Advertisement -

15 वर्ष वयोगटाच्या निर्णायक लढतीत नीलय समोर बूस्टर अकॅडेमीच्याच तनिष पेंडसेचे आव्हान असेल. नीलयने चिवट झुंजीनंतर एस टेबल टेनिस अकॅडेमीच्या खुश पाटीलचे आव्हान 8-11, 11-5, 11-6 आणि 11-9 असे परतवून लावले. तनिषने प्रतीक तुलसानीवर 11-6, 11-7 आणि 12-0 असा विजय मिळवत निर्णायक लढतीत स्थान मिळवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -