घरक्रीडाODI World Cup 2023 : विश्वचषक ट्रॉफीचे अंतराळातून प्रक्षेपण; BCCIकडून व्हिडीओ शेअर

ODI World Cup 2023 : विश्वचषक ट्रॉफीचे अंतराळातून प्रक्षेपण; BCCIकडून व्हिडीओ शेअर

Subscribe

ODI World Cup 2023 : नवी दिल्ली : भारतात यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफीचे (ODI World Cup 2023) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) चक्क अंतराळातून प्रक्षेपण केले आहे. पृथ्वीपासून 1 लाख 20 फूट उंचीवर अनावरण केल्यानंतर ट्रॉफीला नरेेंद्र मोदी स्टेडियमवर उतरविण्यात आले. असे अनोख्या पद्धतीने अनावरण करण्यासाठी आयसीसीने विशिष्ट स्ट्रेटोस्फेरिक फुग्याचा वापर केला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. (ODI World Cup 2023 Launch of World Cup trophy from space Video shared by BCCI)

जय शाह यांनी ट्वीट शेअर करताना म्हटले की, एकदिवसीय विश्वचषक 2023 ची ट्रॉफी अंतराळात अनावरण करताना क्रिकेट जगतासाठी हा एक अनोखा क्षण आहे. अंतराळात पाठवलेल्या क्रीडा ट्रॉफींपैकी ही एक आहे आणि एक नवीन मैलाचा दगड आहे. खरंच भारतातील आयसीसी पुरुष विश्वचषक ट्रॉफी दौऱ्याची सुरुवात चांगली झाली आहे.

- Advertisement -

विश्वचषक दौरा 27 जूनपासून सुरू होत आहे आणि ट्रॉफी कुवेत, बहरीन, मलेशिया, यूएसए, नायजेरिया, युगांडा, फ्रान्स, इटली आणि यजमान भारतासह जगभरातील 18 देशांमध्ये प्रवास करणार आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून लाखो क्रिकेट चाहत्यांना विविध उपक्रमांद्वारे या झगमगत्या ट्रॉफीचे दर्शन होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – क्रिकेटर पृथ्वी शॉ निर्दोष? अभिनेत्रीच्या विनयभंगप्रकरणी पोलिसांची माहिती

आयसीसीचे मुख्य कार्यकारी ज्योफ ऍलार्डिस म्हणाले की, आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी टूर हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आयसीसी विश्वचषकाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. क्रिकेटचे एक अब्जाहून अधिक चाहते आहेत आणि यापैकी जास्तीत जास्त लोकांनी ही ट्रॉफी जवळून पाहावी अशी आमची इच्छा आहे.

हेही वाचा – World Cup : 1983 ते 2023 भारताच्या ऐतिहासिक विजयाला 40 वर्षे पूर्ण!

दरम्यान, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक बीसीसीआय आज (27 जून) जाहीर करणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर प्रत्येकाला लक्ष फक्त भारत आणि पाकिस्तान सामना कधी आहे, यावर असणार आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -