घरक्रीडाकेवळ १५० कोटी लोकांना भारताकडून विश्वविजेतेपदाची अपेक्षा! -हार्दिक

केवळ १५० कोटी लोकांना भारताकडून विश्वविजेतेपदाची अपेक्षा! -हार्दिक

Subscribe

विराट कोहलीच्या भारतीय संघाने मागील काही वर्षांत एकदिवसीय क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. या संघात विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनीसारखे अनुभवी फलंदाज, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमारसारखे प्रतिभावान वेगवान गोलंदाज, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल ही फिरकी जोडगोळी आहे. तसेच हार्दिक पांड्यासारखा सामना कोणत्याही क्षणी भारताकडे फिरवू शकतो असा अष्टपैलूही आहे.

त्यामुळेच इंग्लंडमध्ये सुरू असलेला विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय संघाला प्रमुख दावेदार मानले जात आहे. मात्र, टीम इंडियावर जास्त दबाव नाही, कारण केवळ १५० कोटी लोकांनाच आमच्याकडून विश्वविजेतेपदाची अपेक्षा आहे, असे गमतीत हार्दिक म्हणाला.

- Advertisement -

तसेच त्याने पुढे सांगितले, १४ जुलै रोजी मला विश्वचषक माझ्या हातात हवा आहे, हे एकच उद्दिष्ट आहे. नुसता विश्वचषक जिंकण्याचा विचारही मला खूप आनंद देतो. विश्वचषक जिंकणे हेच माझे लक्ष्य आहे. आम्ही विश्वविजेते होऊ अशी मला आशा आहे. भारतासाठी खेळणे यापेक्षा माझ्यासाठी कोणतीही गोष्ट मोठी नाही. क्रिकेट हे माझे जीवन आहे. या खेळावर माझे खूप प्रेम आहे. मागील तीन-साडे तीन वर्षे मी याच (विश्वचषक) स्पर्धेसाठी तयारी आणि सराव करत होतो.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने २०११ मध्ये विश्वचषक जिंकला. त्यानंतर ८ वर्षांनी विश्वचषकात खेळण्याची संधी मिळणे हे हार्दिकसाठी स्वप्नवत आहे. याबाबत तो म्हणाला, काही दिवसांपूर्वीच मित्राने मला एक फोटो पाठवला आणि विचारले की मला तो क्षण आठवतो का? ‘नक्कीच आठवतो’ असे मी त्याला म्हणालो.

- Advertisement -

भारताने २०११ चा विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने आमचा जल्लोष करतानाचा फोटो काढला होता. आम्ही रस्त्यावर उतरून जल्लोष करत होतो, कारण प्रत्येक भारतीयासाठी हा जणू उत्सवच होता. इतक्या रात्री, इतक्या लोकांना मी रस्त्यावर त्याआधी पाहिले नव्हते. त्यावेळी मी खूप भावुक झालो होतो. त्यानंतर ८ वर्षांनी स्वतः विश्वचषकात खेळणे, हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -