घरक्रीडाWorld Cup 2019: यावेळी 'मौका' पाकिस्तानकडे; इन्झमाम उल हकचा विश्वास

World Cup 2019: यावेळी ‘मौका’ पाकिस्तानकडे; इन्झमाम उल हकचा विश्वास

Subscribe

आतापर्यंत विश्वचषकात सहा वेळा भारताकडून पराभूत झाल्यानंतर यावेळी आम्ही भारताला हरवू, असे पाकिस्तानचे माजी कर्णधार इन्झमाम यांना वाटत आहे.

क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत सहा वेळा आमनेसामने आले आहेत. मात्र सहा वेळा भारताने पाकिस्तानचा पराभव केलेला आहे. ३० मे पासून इंग्लड आणि वेल्स येथे विश्वचषकाची सुरुवात होत आहे. त्यापूर्वीच पाकिस्तान संघाचे निवडकर्ते इन्झमाम उल हक यांनी भारताला इशारा दिला आहे. १६ जून रोजी भारत विरूद्ध पाकिस्तान असा सामना होणार आहे. या सामन्यात पाकिस्तान आपल्यावरचा पराभवाचा डाग धुवून टाकेल, असे इन्झमान यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानने विश्वचषकात आतापर्यंत एकदाही विजय मिळवलेला नाही. मात्र पाकिस्तानच्या माजी कर्णधार इन्झमामला वाटते की यावेळी पाकिस्तान जुना विक्रम मोडीत काढेल. पाकिस्तानमधील एक वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये इन्झमामने हा विश्वास व्यक्त केला आहे. १६ जून रोजी मँचेस्टर येथे दोन्ही संघ आपापसात भिडणार आहेत.

- Advertisement -

इन्झमाम पुढे म्हणाला की, “भारत पाकिस्तानच्या सामन्याला खूप गंभीरतेने घेतात. पाकिस्तानमधील काही लोकांचे असे म्हणणे आहे की, फक्त भारताविरोधातील सामना जिंकला तरी विश्वचषक जिंकण्यासारखे आहे.” तसेच आम्ही फक्त भारतालाच नाही तर इतर संघाना देखील हरवण्याची क्षमता ठेवून आहोत. पाकिस्तानने मागचे दहा एकदिवसीय सामने गमावलेले आहेत. एवढेच नाही तर विश्वचषकाच्या सराव सामन्यात देखील अफगानिस्ताकडून पाकिस्तानला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -