घरक्रीडासेरेनाचे विजयांचे शतक; उपांत्य फेरीत प्रवेश

सेरेनाचे विजयांचे शतक; उपांत्य फेरीत प्रवेश

Subscribe

अमेरिकन ओपन

अमेरिकेची महान महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्सने अमेरिकन ओपनमध्ये आपला १०० वा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. २३ वेळच्या ग्रँड स्लॅम विजेत्या सेरेनाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात चीनच्या वांग क्विआंगचा ६-१, ६-० असा धुव्वा उडवला. हा सामना अवघा ४४ मिनिटे चालला. यंदाच्या अमेरिकन ओपनमधील हा सर्वात कमी कालावधी चाललेला सामना आहे.

उपांत्यपूर्व फेरीतील विजयामुळे सेरेनाचे अमेरिकन ओपनमधील विजयाचे शतक पूर्ण झाले. पुढील फेरीत विजय मिळवल्यास सेरेना क्रिस एव्हर्टच्या १०१ विजयांच्या विक्रमाशी बरोबरी करेल. मी या स्पर्धेत १०० सामने जिंकले आहेत, यावर विश्वास बसत नाही. मी या स्पर्धेत जेव्हा पहिला सामना खेळले, तेव्हा मी बहुतेक १६ वर्षांची होते. मी त्यावेळी १०० विजयांचा विचारही केला नव्हता. मी इतकी वर्ष खेळू शकेन असे मला वाटले नव्हते, असे सेरेना म्हणाली.

- Advertisement -

उपांत्य फेरीत सेरेनासमोर युक्रेनच्या एलिना स्विटोलिनाचे आव्हान असेल. पाचव्या सीडेड एलिनाने उपांत्यपूर्व फेरीत ब्रिटनच्या जोआना कोंटाला ६-४, ६-४ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. एलिनाने याआधी या स्पर्धेत व्हिनस विल्यम्स आणि २०१७ साली उपविजेत्या ठरलेल्या मॅडिसन किजचा पराभव केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -