घरक्रीडास्टिव्ह वॉ सारखा स्वार्थी खेळाडू पाहिला नाही - शेन वॉर्न

स्टिव्ह वॉ सारखा स्वार्थी खेळाडू पाहिला नाही – शेन वॉर्न

Subscribe

ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न याचे 'नो स्पिन' या नावाने आत्मचरित्र प्रकाशित होणार आहे. यामध्ये त्याने माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह वॉ अत्यंत स्वार्थी होता अशी टीका केली आहे.

१९९९ साली ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्याआधी काहीच महिने त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यातून सावरत असलेल्या वॉर्नला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत मालिकेत चांगले प्रदर्शन करता आले नव्हते. त्यामुळे संघाचा कर्णधार स्टिव्ह वॉ याने उपकर्णधार असणाऱ्या वॉर्नला संघात स्थान दिले नाही.

जेव्हा विश्वास दाखवण्याची गरज होती तेव्हा कर्णधाराने दाखवला नाही

वॉर्नने या प्रसंगाबाबत आपल्या पुस्तकात लिहिले, “आम्ही वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात २-१ ने मागे होतो. मी त्यावेळी संघाचा उपकर्णधार होतो. माझे प्रदर्शनही अगदी साधारण होते. चौथ्या सामन्याआधी संघ निवडीसाठी मी, वॉ आणि प्रशिक्षक जेफ मार्श यांच्यात चर्चा झाली. यामध्ये वॉ मला म्हणाला की माझ्यामते पुढील सामन्यात खेळू नयेस. तुझी गोलंदाजी आता चांगली होत नाही आहे. यावर मी त्याला म्हणालो की माझा खांदा बरा व्हायला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत आहे. मात्र हळूहळू माझी गोलंदाजी सुधारत आहे. मी पुढच्या सामन्यात चांगले प्रदर्शन करिन. यावर वॉ म्हणाला की मला तसे वाटत नाही.” मला जेव्हा कर्णधाराच्या विश्वासाची गरज होती तेव्हाच त्याने माझ्यावर विश्वास दाखवला नाही.

 

माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह वॉ (सौ-The Telegraph)

त्याला फक्त ५० ची सरासरी ठेवायची होती

वॉर्न वॉ बद्दल म्हणाला, “स्टिव्ह वॉ हा खूप स्वार्थी होता. त्यांच्याइतका स्वार्थी खेळाडू मी पाहिलेला नाही. त्याचे फक्त स्वतःच्या कामगिरीवर लक्ष असायचे. त्याला फक्त ५० ची सरासरी ठेवायची होती. हे सगळेच खूप बालिश होते.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -