घरक्रीडानेमबाजी विश्वचषक स्पर्धा

नेमबाजी विश्वचषक स्पर्धा

Subscribe

भारतीय नेमबाजांना नेमबाजी विश्वचषकाच्या अखेरच्या दिवशी एकही पदक मिळवता आले नाही. मात्र, असे असतानाही भारत या विश्वचषकाच्या अखेरीस अव्वल स्थानी राहिला. ही सलग दुसरी तर मागील दोन वर्षांतील तिसरी वेळ होती, जेव्हा भारत नेमबाजी विश्वचषकाच्या अव्वल स्थानी राहिला. भारतीय नेमबाजांनी या विश्वचषकात एकूण ४ पदके जिंकली. यात ३ सुवर्ण आणि १ रौप्यपदकाचा समावेश होता. चीन २ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्यपदकासह दुसर्‍या स्थानी राहिला.

या विश्वचषकात अंजुम मुद्गिल आणि दिव्यांश सिंह पन्वर यांनी भारताचे पदकांचे खाते उघडले. त्यांनी १० मीटर एअर रायफलच्या मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर मनू भाकर आणि सौरभ चौधरी या युवा नेमबाजांच्या जोडीने १० मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली होती.

- Advertisement -

सांघिक स्पर्धेत पदक मिळवल्यानंतर दिव्यांशने वैयक्तिक गटातही आपली चमक दाखवली. त्याने १० मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदक मिळवत ऑलिम्पिक कोटाही मिळवला. ही स्पर्धा संपण्याच्या एक दिवस आधी अभिषेक वर्माने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते.

अखेरच्या दिवशी निराशा

- Advertisement -

या विश्वचषकाच्या अखेरच्या दिवशी मनू भाकर आणि गायत्री नित्यानंदम यांना अनुक्रमे २५ मीटर एअर पिस्तूल आणि ५० मीटर रायफल ३ पोजिशन या स्पर्धांची अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. मनूने महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तूल प्रकारच्या पात्रता फेरीत ५८६ गुणच मिळवता आले. त्यामुळे ती १७ व्या स्थानी राहिली. याच स्पर्धेत एशियाडमध्ये सुवर्ण कामगिरी करणार्‍या राही सरनोबतला ५७९ गुणच मिळवता आले आणि ती २६ व्या स्थानी राहिली. भारताचीच पिंकी यादव ५७० गुणांसह ५६ व्या स्थानी राहिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -