घरक्रीडातेंडुलकरशी पृथ्वीची तुलना थांबवा - कोहली

तेंडुलकरशी पृथ्वीची तुलना थांबवा – कोहली

Subscribe

वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या पृथ्वी शॉची बरेच चाहते माजी महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरशी तुलना करत आहेत. पण कर्णधार विराट कोहलीने पृथ्वीची कोणाशीही तुलना करू नये असे चाहत्यांना आवाहन केले.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने विजय मिळवला. या विजयात मुंबईकर सलामीवीर पृथ्वी शॉने दमदार प्रदर्शन केले. त्याने पदार्पणातच शतक झळकावले. या त्याच्या कामगिरीमुळे तसेच खेळण्याच्या पद्धतीमुळे भारताचे चाहते त्याची भारताचा माजी महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर याच्याशी तुलना केली जात आहे. पण कर्णधार विराट कोहलीने पृथ्वीची कोणाशीही तुलना करू नये असे चाहत्यांना आवाहन केले आहे.

पृथ्वीकडे मोठा खेळाडू होण्याची क्षमता

“पृथ्वीने केलेल्या कामगिरीचा आम्हा सर्वांनाच आनंद आहे. पण म्हणून त्याची कोणाशीही तुलना करणे किंवा त्याच्यावर अधिक दबाव टाकणे योग्य नाही. त्याला त्याच्या खेळाचा आनंद उपभोगू दिला पाहिजे. त्याच्यामध्ये मोठा खेळाडू होण्याची क्षमता आहे. त्याने तसे आपल्या पहिल्या कसोटीतच दाखवून दिले आहे आणि तो असेच प्रदर्शन पुढेही सुरू ठेवू शकेल. कारण त्याला नव्या गोष्टी शिकण्याची आवड आहे. तो खूप हुशार आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थिरावण्यासाठी त्याला वेळ देण्याची गरज आहे. त्याच्यावर कोणताही दबाव टाकणे योग्य नाही”, असे कोहली म्हणाला.

आयपीएलमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाचा दबाव जाणवत नाही

भारताच्या कसोटी संघात रिषभ पंत, हनुमा विहारी आणि पृथ्वी शॉ या तीन खेळाडूंनी नुकतेच पदार्पण केले. या तिघांनीही पदार्पणातच चांगले प्रदर्शन केले आहे. कर्णधार कोहलीच्या मते आयपीएलमध्ये खेळल्याचा फायदा नव्या खेळाडूंना होतो. कोहली याबाबत म्हणाला, “पूर्वी जेव्हा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करायचे तेव्हा त्यांना खूप दबाव जाणवायचा. पण आताच्या खेळाडूंना तो जाणवत नाही. कारण ते आयपीएलमध्ये खूप प्रेक्षकांसमोर खेळतात. तिथे खेळताना खूप दबाव असतो. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना दबाव तितकासा जाणवत नाही.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -