घरक्रीडाTokyo Olympics : दुती चंद उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी, ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात

Tokyo Olympics : दुती चंद उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी, ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात

Subscribe

महिला हॉकी टीमची उपांत्य फेरीत धडक

भारताची २०० मीटरमधील धावपटू दुती चंदला उपांत्य फेरी (सेमीफायनल) गाठण्यात अपयश आली आहे. यामुळे दुती चंदचा टोकियो ऑलिम्पिकचा प्रवास संपुष्टात आला आहे. दुती २०० मीटरमध्ये ४ थ्या हीटमध्ये सातवी आली असून सर्वोत्तम वेळ घेतला. दुतीने २३.८५ सेकंद एवढा वेळ चौथ्या हीटमध्ये घेतलाय. टोकियो ऑलिम्पिकमधील सामन्यांमध्ये भारताला आजचा दिवस महत्त्वाचा आहे. महिला हॉकी टीम उपांत्यपूर्व फेरीसाठी खेळत आहेत.

भारताची धावपटू दुतीला यापुर्वी १०० मीटर हीटमधून वगळण्यात आले होते. २०० मीटरमध्ये दुती ४ हीटमध्ये सात खेळाडू होते यांमध्ये दुती सातव्या क्रमांकावर आली आहे. तीन खेळाडू त्यांच्या गटातून पुढे गेले आहेत तर दुती चंदचा प्रवास मात्र इथेच थांबला आहे. दुतीचा २०० मीटरमध्ये वैयक्तिक वेळ हा २३.०० सेकंद आहे मात्र तिने २३.८५ सेकंदचा वेळ घेतला यामुळे अपयशी ठरली आहे. दुतीच्या गटामध्ये प्रथम आलेल्या नामिबियाची खेळाडू क्रिस्टीन मोमा ने २२. ११ सेकंद वेळ घेत अंतर कापले आहे.

- Advertisement -

महिला हॉकी टीम उपांत्यपूर्व फेरी खेळत असून उपांत्यफेरीत धडक दिली आहे. यामुळे भारतीय महिला हॉकी टीमकडून आणखी एके पदकाची अपेक्षा भारताला लागली आहे. सिंधू नंतर भारताला आज आणखी एका मेडलची अपेक्षा आहे. भारताच्या पुरुष हॉकी संघानेही उपांत्य फेरीमध्ये मजल मारली आहे. तसेच थाळी फेकमधील भारतीय महिला खेळाडू कमलप्रीत कौर अंतिम फेरीसाठी खेळणार आहे. यामुळे कमलप्रीतची कामगिरी कशी असेल याकडे साऱ्या भारतातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. कमलप्रीत चांगली खेळाडू असून पदकासाठी तिला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. कमलप्रीतने ६४ मीटर पर्यंत थाळी फेक करुन अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -