घरठाणेराजकीय वातावरणाबरोबर तापमानातही वाढ

राजकीय वातावरणाबरोबर तापमानातही वाढ

Subscribe

ठाण्याचा पारा 41.3 अंश सेल्सिअसवर

ठाण्यात गेल्या तीन दिवसात राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना, या दिवसात दुसरीकडे तापमानाने चांगली उसळी घेतली आहे. गुरुवारी ठाणे शहरातील तापमानाचा पारा हा 41.3 अंशावर पोहोचला. 24 फेब्रुवारीनंतर गुरुवारी तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या आरपार गेल्याचे पाहण्यास मिळाले. यामुळे ठाणेकर नागरिकांच्या अंगातुन घामाच्या धारा वाहत होत्या. गतवर्षी म्हणजे 2022 मध्ये होळीच्या दुसर्‍याच 17 ( मार्चला ) दिवशी ठाणे शहराचे तापमान 45.6 अंश सेल्सिअसने वधारला होता. त्यातच हवामान विभागाने मुंबई, रायगड, पालघरसह ठाणे जिल्ह्यातही 14 ते 16 मार्च 2022 या कालावधीत उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार ठाण्याचा पारा 35 अंशाच्या पुढे जाऊ लागला. तो आकडा आता जवळपास 40 अंशाच्या आसपास किंवा त्याच्याही पुढे जाताना वारंवार दिसून आला होता.

यंदा मात्र, फेब्रुवारी 2023 च्या 19 आणि 23 या कालावधीत उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तविला होता. त्या कालावधीत तापमानाचा पारा 19 फेब्रुवारीला 41.9 अंश सेल्सिअसवर गेले होते. त्यानंतर 23 फेब्रुवारीला पुन्हा तापमानाचा पारा हा 41.8 अंशावर गेला होता. त्यातच पुन्हा एकदा शुक्रवारी 24 फेब्रुवारीपासून पुढे चार दिवस हवामान विभागाने उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तवला असताना, पहिल्याच दिवशी म्हणजे 24 फेब्रुवारीला तापमानाचा पारा 42.2 अंश सेल्सिअस इतका नोंदवला गेला आहे. उर्वरित दिवसात आणि आगामी होळीनंतर हे तापमान वाढण्याची शक्यता होती. मात्र त्याचवेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्याच्यानंतर ही ठाण्यात अवकाळी पाऊस झाल्याने वातावरणात गारवा पसरला होता. याचदरम्यान मेघ दाटून येत येत असल्याने तापमानही 35 अंशाच्या आसपास होते. त्यामुळे उष्णतेची झळ बसत नव्हती. मात्र एक एप्रिलला तापमानाचा पारा अचानक वाढला. तापमान 37.2 अंशावर गेले. 2 आणि 3 एप्रिल रोजी पुन्हा त्याच्यामध्ये घट झाल्याची दिसून आली. पंरतु 4 एप्रिलला ठाण्यात अचानक राजकीय वातावरण तापल्याचे पाहण्यास मिळाली. त्याचवेळी दुसरीकडे तापमानाचा पारा ही चढल्या. 4 एप्रिलला पारा 39.1 वर गेला होता. 5 एप्रिलला 0. 4 अंश सेल्सिअसने घट होऊन तो 38.7 अंश सेल्सिअस वर थांबा. मात्र गुरुवारी म्हणजे 6 एप्रिल रोजी पार्‍याने उसळी घेत 41.3 अंश सेल्सिअस वर उडी मारली. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दुपारच्या सुमारास उन्हाच्या झळा लागू लागल्या आहेत. ठाणेकर नागरिकांनी हा वाढता उकाडा नकोसा झाला आहे. अंगातून घामाच्या धारा वाहत नसल्याने आणि अंगाला चटके लागत असल्याने ऑफिस आणि घरात पंख्या खाली किंवा एसीमध्ये बसणे नागरिकांकडून पसंत केल्याचे पाहण्यास मिळत आहे.

- Advertisement -

ठाण्याचे असे होते तापमान
तारीख तापमान
1 एप्रिल 37.2
2 एप्रिल 36.1
3 एप्रिल 34.7
4 एप्रिल 39.1
5 एप्रिल 38.7
6 एप्रिल 41.3

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -