घरठाणेKalyan Eye Hospital : कल्याणमध्ये अत्याधुनिक नेत्र रुग्णालय; 31 जुलैपर्यंत मोफत तपासणी

Kalyan Eye Hospital : कल्याणमध्ये अत्याधुनिक नेत्र रुग्णालय; 31 जुलैपर्यंत मोफत तपासणी

Subscribe

 

 

- Advertisement -

कल्याण: नेत्रउपचारांच्या क्षेत्रांत 1957 सालापासून कार्यरत असलेल्या डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलतर्फे कल्याणमधील त्यांच्या अत्याधुनिक नेत्रउपचार रुग्णालयाचे  उदघाटन करण्यात आले. शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे आणि शहराध्यक्ष रवि मोरे ह्या सन्माननीय पाहुण्यांची उदघाटन समारंभाला उपस्थिती होती. शिवाय, डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलचे सीओओ (मुख्य कार्यपालन अधिकारी) राहुल अग्रवाल आणि क्लिनिकल सेवा विभागाच्या प्रादेशिक प्रमुख तसेच डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलच्या चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर डॉ. वंदना जैन या देखील सोहळ्याला उपस्थित होत्या

 

- Advertisement -

खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, “कल्याणमध्ये अत्याधुनिक सुविधा नागरिकांना आता मिळणार आहे. उच्च दर्जाची आणि परवडणारी सेवा देणारे हे रुग्णालय कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी एक आदर्श रुग्णालय असेल. असा मला पूर्ण विश्वास आहे, की रुग्णालयाच्या अत्यंत कुशल डॉक्टरांच्या चमूमुळे आणि अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे हे केंद्र वैद्यकीय उत्कृष्टतेचे दीपस्तंभ बनेल. आरोग्यसेवा वितरणामध्ये खाजगी क्षेत्राच्या सहभागाला प्रोत्साहन देऊन आम्ही सर्वांसाठी दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा प्रत्यक्षात आणण्याच्या आमच्या सरकारच्या संकल्पनेला गती देतो. मी डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल ग्रुपचे त्यांच्या समर्पणाबद्दल कौतुक करतो.”

 

शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे म्हणाले, आपले डोळे खूप महत्त्वाचे असतात. आपल्या स्वत:च्या भल्यासाठी तर ते महत्त्वाचे असतात, शिवाय, डोळ्यांमुळे आपण नेत्रदानासारखे उदात्त कार्य करून दुसऱ्या व्यक्तीलाही दृष्टीची भेट देऊ शकतो. डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलची या क्षेत्रातील बांधिलकी कौतुकास्पद आहेत. त्यांची देशभरात 132 तर जगभरात 148 नेत्रउपचार रुग्णालये आहेत. त्यांचे काम खरोखर प्रशंसनीय आहे.”

 

शिवसेनेचे शहरप्रमुख रवि पाटील म्हणाले: हे अत्याधुनिक रुग्णालय डोळ्यांवरील दर्जेदार उपचारांमध्ये क्रांती घडवून आणेल. या उपक्रमामुळे कल्याणमधील नागरिकांना अपवादात्मक दर्जाचे उपचार व सेवा मिळतील व आपल्या समुदायाच्या कल्याणात भर पडेल असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो.

 

डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलचे सीईओ राहुल अग्रवाल म्हणाले, आता डोळ्यांच्या इलाजासाठी मुंबईला जाण्याची गरज नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अतुलनीय कौशल्यासह आम्ही आमच्या रुग्णांसाठी सर्वोत्तम उपचार देण्याची आम्ही खात्री देतो. महाराष्ट्रातील आमचे 17 वे रुग्णालय सादर करताना आम्ही जीवन बदलण्याचा प्रवास सुरू केला आहे. आम्ही सध्या आमच्या कल्याण रुग्णालयात जुलै अखेरपर्यंत मोफत सल्ला देणार आहोत. अनेक नागरिकांना सुलभ आरोग्यसेवा देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मोफत सल्ला देऊन डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल्स डोळ्यांच्या आरोग्याला चालना देण्यासाठी आणि व्यक्तींना आर्थिक अडथळ्यांशिवाय व्यावसायिक वैद्यकीय सल्ला मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहे.”

हेही वाचाःमोदी@९ महा-जनसंपर्क अभियान अंतर्गत ठाण्यात डॉक्टर,खेळाडू व विद्यार्थ्यांचा सत्कार

डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलच्या क्लिनिकल सर्व्हिसेस विभागाच्या प्रादेशिक प्रमुख -मुख्य धोरण अधिकारी डॉ. वंदना जैन म्हणाल्या, रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा एक अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आणि प्रगत निदान उपकरणे आहेत. मोतीबिंदूपासून काचबिंदू, रेटिनल ते कॉर्नियल डिसऑर्डर, अपवर्तक समस्या ते बालरोगविषयक समस्यांपर्यंत विविध डोळ्यांच्या आजारांवर निपुण असलेल्या नेत्रतज्ज्ञांच्या आमच्या अत्यंत कुशल टीमसह आम्ही कल्याणच्या नागरिकांना अतूट समर्पण देण्यास बांधील आहोत.

डॉ. अग्रवाल रुग्णालयाचा प्रवास

सन २०२० मध्ये, डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल्सने मुंबईच्या बाजारपेठेत प्रवेश केला. गेल्या तीन वर्षांत लक्षणीय वाढ अनुभवली. सन २०२३ मध्ये भांडुप आणि ताडदेव येथे सेवा सुरू केली आहे. सध्या, डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल्स महाराष्ट्रातील 16 रुग्णालये चालवत आहेत. ज्यात मुंबईतील 6, पुण्यातील 7, नाशिकमध्ये 2 आणि सातारा येथे 1 रुग्णालयाचा समावेश आहे. कल्याणमधील डॉ. अग्रवाल यांचे महाराष्ट्रातील 17 वे रुग्णालय आहे. येत्या दोन वर्षांत महाराष्ट्रात आणखी २५ रुग्णालये जोडण्याची महत्त्वाकांक्षी योजना या समूहाची आहे. विशेषत: मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव आणि अकोला येथील बाजारपेठांबद्दल उत्सुक आहेत. डॉ. अग्रवाल आय क्लिनिक” नॉन-मेट्रो आणि ग्रामीण भागात स्थापन करणे हे डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल्सचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून दर्जेदार आणि परवडणार्‍या सेवेची गरज असलेल्या अधिक रुग्णांना त्यांच्या सेवा मिळू शकतील.

दहा देशांमध्ये 147 रुग्णालये

भारत आणि आफ्रिकेतील 147 हून अधिक रुग्णालयांच्या नेटवर्कच्या उपस्थितीसह, समूहाने 10 देशांमध्ये आणि भारतातील 12 पेक्षा जास्त राज्यांमध्ये रुग्णालयांची स्थापना केली आहे. 450 हून अधिक नेत्रतज्ञ आणि 6,000 कर्मचार्‍यांच्या समर्पित टीमचा अभिमान बाळगून, रुग्णालयांनी 12 दशलक्षाहून अधिक रुग्णांची काळजी घेतली आहे. दर्जेदार नेत्रसेवा पुरवण्याव्यतिरिक्त, डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल्स नेत्ररोग आणि संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक आणि संशोधन कार्यक्रम देखील देतात. डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल डोळ्यांच्या आजारांवर एकाच छताखाली उपाचार करणारे नेत्र रुग्णालयांचे भारतातील सर्वात मोठे नेटवर्क 1957 मध्ये स्थापित करण्यात आले होते. भारत आणि आफ्रिकेसह 10 देशांमध्ये डॉ. अग्रवाल यांची 147 रुग्णालये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -