घरठाणेमहिला कर्मचार्‍यांची सोनोमॅमोग्राफीसह आरोग्य तपासणी-आयुक्त अभिजीत बांगर यांची माहिती

महिला कर्मचार्‍यांची सोनोमॅमोग्राफीसह आरोग्य तपासणी-आयुक्त अभिजीत बांगर यांची माहिती

Subscribe

ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी ठामपाच्या महिला अधिकारी व कर्मचार्‍यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून महिलांमध्ये उद्भवणार्‍या दुर्धर आजारांचे वेळीच निदान व्हावे यासाठी सोनोमॅमोग्राफी, पॅप स्मीयर, रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, मुखाचा कर्करोग या चाचण्या व मोफत आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
जगभरात असंसर्गजन्य आजारांमुळे (उदा. पक्षघात, कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब) यामुळे सुमारे 74 टक्के नागरिकांचा मृत्यू होतो. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने अशा आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रण ठेवण्याचे ध्येय ठेवलेले आहे. कुटूंबातील सदस्यांवर व सामाजिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम पाहता, अशा आजारांच्या आवश्यक असलेल्या तपासण्या वेळीच करून त्यावर त्वरीत उपचार करणे, ही काळाची प्राथमिक गरज आहे. तसेच मधुमेह व रक्तदाब हे आजार रुग्णांच्या नकळत त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये घर करुन मृत्यूस कारणीभूत ठरत असतात.

महिलांमध्ये असलेल्या स्तनाचा व गर्भपिशवीचा कर्करोग या आजारांचे प्रमाण जास्त आहे. अशा प्रकारच्या आजारांची तपासणी करून ते समुळ नाहीसे करणे शक्य आहे. यासाठी महिलांनी देखील गांभिर्याने व काळजीपूर्वक अशा चाचण्या करुन घेणे गरजेचे आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील 35 वर्ष किंवा 35 वर्षांवरील महिला अधिकारी व कर्मचा-यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सोनोमॅमोग्राफी, पॅप स्मीयर, रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, मुखाच्या कर्करोगाची मोफत तपासणी करण्यासाठी राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना आयुक्त श्री. बांगर यांनी निर्देश दिले आहेत. तसेच या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, कळवा ठाणे येथे वरील आजारांच्या चाचण्या करून आजाराचे निदान करण्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे आयुक्त बांगर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -