घरठाणेठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग तहानलेलाच

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग तहानलेलाच

Subscribe

शहापूर परिसरात पाण्यासाठी वणवण, नऊ गावे, 43 वाड्यात पाणी टंचाई. जिल्ह्यात 15 टँकरद्वारे पाणी पुरवठा

ठाणे । ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरातील गावे, वाड्या, पाडे या परिसरात कडक उन्हाळा सुरुवात होत नाही तेच परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी खोल जाऊ लागली. तर काही भागात विहिरी मधील पाणी कमी होऊ लागले आहे. यामुळे पाण्यापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शहापूर परिसरातील नागरिकांचे पाण्याविना हाल सुरु झाले आहेत, ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा सुरु झाला आहे. आता पर्यंत 15 टँकर द्वारे गाव, पाड्यांना पाणी पुरवठा करण्यात आला आहे. पण अद्यापही ग्रामीण परिसरातील इतर गावे देखील पाण्याविना तहानलेलीच आहेत. यामुळे दरवर्षी या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई होते. याकडे शासनाने गांभीर्याने विचार करून पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवणे आवश्यक आहे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग शहापूर तालुका या परिसरात 42 गावे दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जात असतात. यामुळे मार्चमध्येच 9 गावे पाणी टंचाईला सामोरे जात आहेत. शहापूर परिसरात तानसा सारखे मोठे धरण आहे. पण इतके मोठे धरण असून देखील आजूबाजूचे गाव, पाडे पाण्याविना आहेत. याचा दरवर्षी उन्हाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे.
फुगाले, दांड, कळभोंडे, कोथळे, माळ, विहिगाव, उम्रावने, उंबरखांड या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे. तर नारळवाडी, पराधवाडी, बिबळवाडी, कोळीपाडा, वारलीपाडा, उठावा, कोळीपाडा, तेलमवाडी, कातकरवाडी, वारेपाडा, भाकरेपाडा, वरचा गायदरा, बोण्डरपाडा, भस्मेपाडा, राईचीवाडी, खरमेपाडा, सखारामपाडा, आंब्याचापाडा, वारघडवाडी, दुब्याचीवाडी, काटीचापाडा, शिदवाडी, रातांधळेपाडा, सुगाव, धाणकेपाडा, काजूपाडा, डोंगरीपाडा, कृष्णानगर, कैलासपाडा, उंबरवाडी हे पाडे पाणी टंचाईग्रस्त झाले आहेत. ह्या मुळे दरवर्षी या गाव पाड्यांना जिल्हापरिषदेच्या वतीने खासगी पाणीपुरवठा केला जात असून अधिक भार जिल्हा परिषदेच्या कीजोरीवर होत आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात पाणी टंचाई होत असल्याने नागरिकांचे पाण्याविना हाल होऊ नये, याकरिता पाणी पुरवठा सुरु केला आहे. या संदर्भात ठाणे जिल्हाधिकारी यांचे देखील लक्ष असून ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हापरिषदेच्या वतिने जिल्हाधिकारी यांना पाणी पुरवठा केलेल्या गावांचा साप्ताहिक अहवाल पाठवण्यात येत आहे. यामुळे पाणी टंचाई गाव, पाड्याना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यामध्ये सतत वाढ होत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ग्रामीण भागातील गाव, पाड्यांना दरवर्षी लाखो लिटर टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. याकरता लाखो रुपये देखील प्रशासनाचे पाणी पुरवठा करता खर्च होत आहे. जिल्हा परिषदेमार्फत अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, शहापूर, मुरबाड येथील गाव तसेच पाड्यांना शासकीय, खाजगी पद्धतीने पाणी पाणी पुरवठा केला जातो.
पण कडक उन्हाची झळ गाव, पांड्याना लागणे सुरु झाल्याने पाणी टंचाईची सुरुवात शहापूर तालुक्यातून सुरु झाली आहे. ह्याचा त्रास ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याविना हाल होऊ नये, याकरता शासन स्तरावर पाणी पुरवठा करणे दरवर्षीं सारखे सुरू झाले आहे. शहापूर तालुक्यात पंचायत समिती हद्दीतील पाणी टंचाई ग्रस्त गावे, पाड्यामध्ये 12 हजार, 683 नागरिकांची लोकसंख्या आहे. आता 9 गावे 43 पाडे पाणी टंचाईला सामोरे जात आहेत.

आता पर्यंत शहापूर तालुक्यामध्ये 15 टँकरद्वार द्वारे गावे, पाड्यातील नागरिकांना पाणी पुरवठा केला असून जशी मागणी वाढेल तसे पाणी पुरवठा केला जाईल.
– प्रदीप कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा, जिल्हा परिषद ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -