घरठाणेशिवाजी महाराजांनी साकारले लोकांच्या इच्छेतून राष्ट्रनिर्मितीचे स्वप्न

शिवाजी महाराजांनी साकारले लोकांच्या इच्छेतून राष्ट्रनिर्मितीचे स्वप्न

Subscribe

ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचे प्रतिपादन, कल्याण परिमंडलात महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी

जात, धर्म आणि पंथांच्या भेदातून मुक्त स्वराज्य स्थापन करण्याची किमया छत्रपती शिवाजी महाराजांनी जगात सर्वप्रथम केली. त्यांनी लोककल्याणाला केंद्रस्थानी ठेवून राज्य स्थापनेची व्याख्याच बदलली. लोकांच्या इच्छेतून राष्ट्राची निर्मिती होते. हे स्वप्न त्यांनी साकारले, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले. महावितरणच्या कल्याण परिमंडलाच्या वतीने डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कला मंदिरात मंगळवारी (६ जून) आयोजित महापुरुषांच्या संयुक्त जंयती उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर होते. ज्येष्ठ साहित्यिक कांबळे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज ते महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील वैचारीक नात्याची गुंफण उलगडून दाखवली. महात्मा फुले यांनी लोककल्याणकारी शिवाजी महाराजांचे रयतेचा राजा म्हणून असलेले महत्व लोकांसमोर मांडले. तर शाहू महाराजांनी आपल्या कार्यक्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांनी मांडलेल्या विचारांना मुर्त रुप दिले. या तिन्ही महापुरुषांनी रुजविलेल्या जनकल्याणकारी विचारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून कळस चढवला असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य अभियंता औंढेकर यांनी केले. अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. अधीक्षक अभियंते दीपक पाटील, दिलीप भोळे, विजय मोरे, संदीप पाटील, महेश अंचिनमाने, महाव्यवस्थापक अनिल बऱ्हाटे, उप महाव्यवस्थापक सुनिल पाठक, उपसंचालक सुमीत कुमार यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. अभियंते, अधिकारी, कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता चंद्रमणी मेश्राम यांनी यांनी केले. तर अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांनी आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -