घरमुंबईरमेश कदम प्रकरणी 'त्या' चार पोलिसांचे निलंबन; उपनिरीक्षकाचाही समावेश

रमेश कदम प्रकरणी ‘त्या’ चार पोलिसांचे निलंबन; उपनिरीक्षकाचाही समावेश

Subscribe

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक भरारी पथकाने केलेल्या कारवाईत घोडबंदर रोडच्या ओवळा येथील पुष्पांजली रेसिडेंसीच्या आवारातून ५३ लाख ४६ हजारांची रोकड जप्त करण्यात आली होती. ही रोकड राजू बानू खरे यांच्या घरात सापडली असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तुरुंगावास भोगणारे आमदार रमेश कदम यांचे निकटवर्तीय आहेत. या प्रकरणी खरे यांच्यासह आमदार कदम यांच्यावरही शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पवारसह चार पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी निलंबित केले आहे.

या प्रकरणाची विभागीय चौकशी करून अहवाल येताच पुढील कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी कदम यांना या इमारतीत कुणाच्या आदेशाने नेले. नेण्यामागील उद्देश काय होता. या सर्व बाबींचा तपास केला जाणार आहे. अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिली.

- Advertisement -

काय आहे प्रकरण 

अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या भ्रष्टाचारप्रकरणी बंदिस्त राष्ट्रवादी आमदार रमेश कदम याला रुग्णालयात उपचारासाठी नेल्यानंतर संध्याकाळी रमेश कदम हे घोडबंदर रोडवरील पुष्पांजली रेसीडेंसी इमारतीत पोलीस ताफ्यासह पोहचले. त्याचवेळी ठाणे पोलिसांनी मारलेल्या छापेमारीत इमारतीच्या पार्किंगमध्ये रमेश कदम आणि राजू खरे उपस्थित होते. त्यांच्याकडून ५३ लाख ४६ हजाराची रोकड सापडली. ठाणे पोलिसांनी रमेश कदम आणि राजू खरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तर कदम याना घेऊन आलेल्या एक पोलीस उपनिरीक्षक आणि चार पोलीस कॉन्स्टेबल यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -