घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंच्या सभेसाठी उस्मानाबादमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळा बदलल्या

उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी उस्मानाबादमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळा बदलल्या

Subscribe

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रत्येक राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. हा प्रचाराचा शेवटचा आठवडा असून राजकीय पक्षांनी सभांचा धडाका लावला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आठवड्याच्या सुरूवातीच्या दिवशी म्हणजेच आज, सोमवारी तब्बल सात सभा आहेत. त्यापैकी एक सभा उस्मानाबाद येथे होणार आहे. उद्धव यांच्या उस्मानाबादमधील सभेसाठी जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत दोन ठिकाणी तोडण्यात आली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांची सभा जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणात होणार आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले आहे. युतीचे उमेदवार कैलास गाडगे पाटील यांच्या प्रचारासासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पण, या सभेच्या ठिकाणावरुन जोरदार चर्चा सुरु झाली आहे. कारण, या सभेसाठी जिल्हा परिषदेची शाळेचं प्रांगण घेण्यात आले आहे. त्यासाठी त्या शाळेची कपाउंड भींतदेखील तोडण्यात आली आहे. त्यात आणखी भर म्हणून या शाळेतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

सध्या या शाळेतील विद्यार्थ्यांची सहामाही परिक्षा सुरू आहे. आज पाचवी ते आठवी इयत्तेतील विद्यार्थ्यांची परीक्षा आहे. तसेच नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांचा हिंदी, गणित आणि विज्ञान या विषयांचे पेपर आहेत. दिवाळी आधी या परीक्षा संपणार आहेत. पण, उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे या शाळेतील दोन भींत तोडण्यात आल्या. या शाळेत तब्बल ६०० विद्यार्थी शिकतात. या सभेसाठी घेण्यात आलेल्या परवानगीमध्ये संरक्षण भींत तोडावी, असा कुठेही उल्लेख केलेला नाही. तरी सुध्दा आयोजकाने भींत तोडून रस्ता बनवला आहे.

- Advertisement -

उध्दव ठाकरेंच्या सभेमुळे १० वीच्या विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकात बदल करत त्यांचा पेपर १० ऐवजी सकाळी ७ वाजता घेण्यात आला. तर, ११ वीच्या विद्यार्थ्यांचा केमिस्ट्री विषयाचा पेपर रद्द करण्यात आळा आहे. येत्या १८ ऑक्टोबरला हा पेपर होणार आहे. तसेच, दुसऱ्या सत्रातील परीक्षेची वेळ देखील बदलली आहे. सभास्थळी लावण्यात आलेल्या लाऊड स्पीकरमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आवाजाचा त्रास झाला. या प्रकारामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.

हेही वाचा –

राज ठाकरे म्हणाले, आदित्यला निवडणूक लढवावी वाटली तर त्यात गैर काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -