घरमहाराष्ट्रठरलं, उद्या शरद पवार-सोनिया गांधी भेट होणार!

ठरलं, उद्या शरद पवार-सोनिया गांधी भेट होणार!

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक रविवारी संध्याकाळी शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी झाली. या बैठकीमध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार, सुनील तटकरे असे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना बैठकीत झालेल्या चर्चेविषयी माहिती दिली. ‘उद्या (सोमवार) शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा होणार आहे. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा होणार आहे. त्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होऊन त्यामध्ये राज्यात सत्तास्थापनेसंदर्भात निर्णय घेतला जाईल’, असं नवाब मलिक यावेळी म्हणाले.

राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. राज्यात राष्ट्रपती राजवट असताना लवकरात लवकर सरकार स्थापन व्हायला हवं या निष्कर्षावर आम्ही पोहोचलो आहोत. आम्ही काँग्रेससोबत लढलो होतो. आता आम्ही निर्णय घेतला आहे की काँग्रेससोबत चर्चा करून आम्ही पुढचा निर्णय घेणार आहोत. उद्या सोनिया गांधी आणि शरद पवार भेटणार आहेत. त्यांच्यात चर्चा होईल. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते चर्चा करून भूमिका स्पष्ट करतील.

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या ‘गयारामां’ना पुन्हा व्हायचंय ‘आयाराम’?

खरंतर, रविवारीच शरद पवार-सोनिया गांधी भेट होणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, ऐनवेळी ही भेट स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पुण्यात झाली. त्यामध्ये सोमवारी शरद पवार सोनिया गांधींची भेट घेणार असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे. दरम्यान, बैठकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेलेले आणि काही अपक्ष असे सुमारे १५ ते २० आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असून आमची मेगाभरती नाही तर मेरिटवर भरती होईल’, असं ते म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर आता अनेक तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.


सविस्तर वाचा – भाजपची मेगाभरती झाली, आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मेरिटवर भरती!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -