रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा 2.0 हा सिनेमा आज रिलीज होत आहे, त्यानिमित्त सायन येथील रुपम सिनेमागृहाबाहेर रंजनीकांतच्या चाहत्यांनी नेहमीप्रमाणे जल्लोष करायला सुरुवात केली आहे | #MyMahanagar #Zero #2Point0 #2Point0FromToday @akshaykumar @rajinikanth #2Point0FDFS pic.twitter.com/CDc8pTtLwY
— My Mahanagar (@mymahanagar) November 29, 2018
भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट ‘२.०’ आज देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे. सर्वाधीक खर्च केलेला २.० हा चित्रपट भारतातील बिग बजेट सिनेमा बनला आहे. तमिळ आणि हिंदी या दोन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शीत करण्यात आला आहे. त्यानंतर हा सिनेमा दहा भाषांमध्ये डब केला जाणार आहे. हिंदी ‘२.०’ हा चित्रपट करण जोहर आणि अनिल थडानी यांची कंपनी प्रदर्शीत करणार असून या चित्रपटातील स्पेशल इफेक्टकरता देशभरातून ३ हजार टेक्निशिअन्सना बोलावण्यात आले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि रजनीकांत हे दोन दिग्गज कलाकार पहिल्यांदा एकत्र आले आहेत. रजनीकांत यांच्या २०१० साली आलेल्या ‘रोबो’ या चित्रपटाचा ‘२.०’ हा रिमेक असल्याचे सांगितले जाते. चित्रपटात अभिनेत्री एमी जॅक्सनदेखील भूमिका साकारत आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी तब्बल १० महिन्यांचा जास्त कालावधी लागला होता. चित्रपटाचा टिझर ‘3D’मध्ये दाखवण्यात आला होता.