झांसी की राणी लक्ष्मीबाई यांची शौर्यगाथा सांगणारा चित्रपट मणिकर्णिकाने त्याच्या प्रोमोवरूनच प्रेक्षकांची उत्कंठा ताणून ठेवली होती. आता तर या चित्रपटाचा ट्रेलरच रिलीज झाला असून सोशल मीडियावर सर्वाधिक पुसंती या ट्रेलरला मिळत आहे. नवीन वर्षातील जानेवारीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे राणी लक्ष्मीबाईची आपल्या राज्यासाठीची तळमळ स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. युद्धभूमीवरील थरारक प्रसंग, मणिकर्णिका ते राणी लक्ष्मीबाईचा प्रवास आणि देशासाठी प्राण पणाला लावण्याची भावना याचे सुंदर चित्रण या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेत्री कंगना रणौतने मणिकर्णिकाची मध्यवर्ती भूमिका यात साकारली आहे.
वाचा : कंगनाच्या मणिकर्णिका चित्रपटाचा टीझर लाँच
भूमिकेसाठी अपार मेहनत
‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटाकरता कंगनाने राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेसाठी कठोर मेहनत घेतली आहे. या सिनेमासाठी तिने घोडेस्वारीसोबत तलवारबाजीचे धडे गिरवले आहेत. यामध्ये तिने अनेक स्टंटदेखील केले आहेत. अनेक स्टंट करण्यासाठी तिने बॉडी डबलची मदत घेतलेली नाही. अनेक स्टंट तिने स्वतः केलेले आहेत.