Sunday, April 28, 2024
घरमानिनीFashionगुळाचा चहा माहीत आहे पण, गुळाची मेहंदी पण असते?

गुळाचा चहा माहीत आहे पण, गुळाची मेहंदी पण असते?

Subscribe

आपल्या देशात लग्न, सण आणि छोटे कार्यक्रम असो, प्रत्येक मुलगी आणि महिलांना हातावर मेहंदी काढणे किंवा असणे ही जणू एक परंपरा झाली आहे. आपल्या देशात मेहंदीला (mehndi) विशेष असे महत्त्व आहे. या मेहंदी मुली आणि महिलांचे हात-पाय खूप सुंदर दिसतात. या मेहंदीवर (jaggery mehndi) रंग चढणे ही तितकेच महत्त्वाचे असते. लग्न नवरीच्या हाताची मेहंदी रंगली तर तिचा पती तिच्यावर खूप प्रेम करतो, अशी मान्यता आहे. जर मेहंदीवर रंग चढला नाही तर ही मूड खराब होतो.

आता तुमच्या हतावरील मेहंदीवर रंग चढणार आहे. तुम्ही तुमच्या घरच्या घरी गुळापासून मेहंदी (jaggery mehndi) तयार करू शकतात. गुळापासून मेहंदी तयार केली जाते, हे ऐकून थोडे तुम्ही आश्चर्य वाटले असेल. पण, खरेच गुळापासून (jaggery) मेहंदी बनू शकते आणि ही मेहंदी कशी बनवायच याबद्दल आज आपण जाणून घेऊ या.

- Advertisement -

साहित्य

  • 100 ग्रॅम गूळ
  • 2 चमचे मेहंदी पावडर
  • 50 ग्राम साखर
  • 1 चमचा कुंकू
  • 30 ग्राम लवंग
  • 1 चिनी मातीचे वाडगे
  • 1 एक टिन डब्बा

गुळाची मेहंदी अशी बनवा

कृती

- Advertisement -
  • सर्वप्रथम गूळ किसून घ्या.
  • यानंतर एक टिनच्या डब्यामध्ये किसलेला गूळ टाका.
  • या गुळाच्या मिश्रणात लवंग टाका.
  • चिनी मातीच्या भांड्यात सगळी साखर घ्या.
  • यात कुंकू घाला आणि तो टिनचा डब्बा गॅसवर ठेवा.
  • यानंतर डब्यात पाणी भरलेले एक भांडे ठेवा आणि त्याला पूर्ण कव्हर करा.
  • थोड्या वेळाने गुळ वितळू लागेल
  • भांड्यात वाफ निर्माण झालेली असेल
  • हा गरम झालेल्या पाण्याचा डबा गॅसवरून खाली ठेवा
  • यात मेहंदी पावडर मिक्स करा
  • गुळ आणि मेहंदी असलेले पाणी मिक्स करा
  • तुमची मेहंदी हातावर लावण्यासाठी तयार झाली आहे.

अशी लावा गुळाची मेहंदी

  • गुळाची मेहंदी लावण्यासाठी तुम्ही मेहंदी एक्सपर्टची मदत घेऊ शकता.
  • गुळाची मेहंदी लावण्यासाठी तुमच्या तळहातावर साचा घ्या आणि चमच्याच्या मदतीने मेहंदी त्यात टाका आणि यानंतर साचा काढा.
  • तुम्हाला कोणाच्या मदतीने मेहंदी लावायची असेल तर तुम्हाला मेहंदी थोडी घट्ट करावी लागेल.
  • त्यासाठी त्यात जास्त मेहंदी पावडर मिक्स करावी लागेल.

गुळाच्या मेहंदीचे फायदे

गुळाची मेहंदी ही घरी बनवलेली असल्यानं त्यात केमिकल्सचा वापर केला जात नाही. तर बाजारात मिळणाऱ्या मेहंदीमध्ये केमिकल्स मोठ्या प्रमाणात असतात.


 

हेही वाचा – High Heels घालताना समस्या येत असल्यास ‘या’ टीप्स करा फॉलो

- Advertisment -

Manini