घरपालघरजुनं ते सोनं म्हणत गुळाच्या चहाला पसंती

जुनं ते सोनं म्हणत गुळाच्या चहाला पसंती

Subscribe

पुन्हा एकदा ’जुने ते सोनं’ म्हणत गुळाच्या चहाला प्राधान्य दिले जात आहे. विशेषतः युवा पिढीसह वयोवृद्धही गुळाचा चहा चवीने पीत आहेत.

जव्हार: भारतीय पाहुणाचार पध्दतीत चहाला एक आगळवेगळे महत्त्व आहे. पाहुणे आल्यानंतर त्यांचे आदरातिथ्य करण्याची परंपरा आहे. थकून आलेल्या पाहुण्याला ऊर्जा मिळावी, यासाठी प्रथम त्यांना चहाचा पाहुणचार केला जातो. पूर्वी ग्रामीण भागात कोणी बाहेरून आल्यावर घरी तयार केलेल्या गुळाचा पाणी किंवा गुळाचा चहा दिला जात असे त्या वेळी साखरेची उपलब्धता कमीच होती. साखर कारखानदारीतून मोठ्या प्रमाणात साखर तयार होऊ लागल्याने गावखेड्यापर्यंत साखर मुबलक प्रमाणात पोचली. तेव्हा गुळाचा चहा शहरासह गाव-खेड्यातून हद्दपार झाला. गेली ३० ते ४० वर्षे साखरेच्या चहाला प्राधान्य होते. साखरेच्या चहा प्यायल्याने अनेक प्रकरचे त्रास होत असल्याने आता पुन्हा एकदा ’जुने ते सोनं’ म्हणत गुळाच्या चहाला प्राधान्य दिले जात आहे. विशेषतः युवा पिढीसह वयोवृद्धही गुळाचा चहा चवीने पीत आहेत.

प्रतिक्रिया 1

- Advertisement -

साखरेपेक्षा गुळाच्या चहाची चव वेगळी असते. शिवाय गूळ खाण्यासाठी आरोग्याला उत्तम असतो. म्हणून त्यास पसंती दिली जात आहे. परिणामी अनेक ग्राहक अशा स्टॉल्सकडे आकर्षित होत आहेत.
– शफिक कादरी (गुळाचा चहा) विक्रेता.

प्रतिक्रिया 2

- Advertisement -

रसायनविरहित गूळ असावा. शक्यतो रसायनविरहित गूळ असतो. त्यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. त्यासाठी दिवसातून एकदा तरी गुळाचे सेवन करावे. ते आरोग्यासाठी फायदेशीर असते. परिणामी गुळाचा चहा आरोग्याला फायदेशीरच ठरतो.
डॉ. प्रमोद पाटील, वैद्यकीय व्यावसायिक, जव्हार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -