घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअनधिकृत इमारतीवर बुलडोझर; अतिक्रमणधारकांना महानगरपालिकेचा चांगलाच दणका

अनधिकृत इमारतीवर बुलडोझर; अतिक्रमणधारकांना महानगरपालिकेचा चांगलाच दणका

Subscribe

नाशिक :  महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने बुधवारी (दि.३१) धडक कारवाई करत नाशिकरोड भागातील तीन मजली इमारतीवर बुलडोझर चालविला. या कारवाईमुळे अतिक्रमण करणार्‍यांना मात्र चांगलीच धडकी भरली आहे.
दसक येथे अनधिकृत बांधकामावर ही कारवाई करण्यात आली. यावेळी तीन मजली आरसीसी इमारतीचे बांधकाम तोडण्यात आले.

याशिवाय सामनगाव रोडवरील पॉलिटेक्निक कॉलेज येथे 6 ते 7 अनधिकृत घरांचे बांधकाम उद्ध्वस्त करण्यात आले. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त तथा नाशिकरोडचे विभागीय अधिकारी मदन हरीश्चंद्र तसेच नवीन नाशिक विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील, पूर्वचे राजाराम जाधव, पश्चिमचे विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्या संयुक्त नियोजनांतर्गत शहरात अतिक्रमणांविरोधात कारवाई सुरू आहे. नाशिकरोड येेथील कारवाईवेळी अतिक्रमणधारकांनी मोठा विरोध केला होता. मात्र, हा विरोध डावलून कारवाई करण्यात आली. यावेळी 1 पोकलेन, 2 जेसीबींसह सहाही विभागांचे पथक, तसेच नगररचना विभागाचे उपअभियंता विशाल गरुड व सहायक अभियंता ख्रुळे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

मोडकरिस आलेल्या वाड्यांवरही महानगरपालिकेची नजर 

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे. १ जून ते १० ऑक्टोबर या कालावधीत महापालिकेच्या मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनात हा कक्ष सुरू राहील. पावसाळ्यात उद्भवणारी पूर परिस्थिती आणि अन्य आपत्तींचा सामना करण्यासाठी महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. याकरीता आपत्कालीन बचाव पथके तयार करण्यात आली आहेत. पावसाळापूर्व नालेसफाईची कामे हाती घेण्यात आली असून ६७ मलनिःस्सारण केंद्राची सफाई पूर्ण करण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे. तर, ३२ मलनिःस्सारण केंद्रांची सफाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील झाडांच्या फांद्या छाटण्याचेही काम सुरू आहे. शहरातील ५२ वाळलेली झाडे तोडण्यात आली आहे. ७४ धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम सुरू आहे. तसेच, शहरातील विद्युत खांब, केबल जॉइंट, कंट्रोल पॅनलचे ९० टक्क्यांपेक्षा जास्त देखभालीचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -