घरताज्या घडामोडीविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना कोरोना सेंटजॉर्जेसमध्ये क्वारंटाईन

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना कोरोना सेंटजॉर्जेसमध्ये क्वारंटाईन

Subscribe

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. फडणवीस यांनीच ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून मी दिवसरात्र काम करतो आहे. मात्र, आता ब्रेक घ्यावा लागत असल्याचे त्यांनी ट्विट करून स्पष्ट केले. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून मी आता क्वारंटाईन होत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतोय’, असे फडणवीस यांनी ट्विट केले आहे. फडणवीस यांना मुंबईत सेंट जॉर्जेस इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून प्रत्येक दिवस कार्यरत राहण्यात गेला. पण, आता काही काळ विश्रांती घ्यावी लागत आहे. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे’, असे फडणवीस म्हणतात. फडणवीस हे गेली काही दिवस दौर्‍यावर होते. बिहारच्या निवडणुकीचे प्रभारी म्हणून फडणवीस बिहारमध्येही प्रचारासाठी गेले होते. राज्यात परतीच्या पवासाने कहर केल्याच्या पार्श्वभूमीवर ते दुष्काळाच्या पाहणीसाठी दौर्‍यावर होते.

- Advertisement -

सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाच्या आढाव्यासाठी फडणवीस यांनी विभागवार दौरे केले. राज्याच्या सगळ्या भागात जाऊन त्यांनी हॉस्पिटल्सला भेटी देत सरकारी अधिकार्‍यांशी चर्चाही केली होती. शुक्रवारी त्यांना चणचण जाणवू लागल्याने त्यांनी स्वत:ची कोविड चाचणी करून घेतली. यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले. ते सेंट जॉर्जेसमध्ये दाखल झाले असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -