घरताज्या घडामोडीहाथरस घटना : युपीत जातीय दंगली भडकवण्याचा कट सुरक्षा यंत्रणांचा दावा

हाथरस घटना : युपीत जातीय दंगली भडकवण्याचा कट सुरक्षा यंत्रणांचा दावा

Subscribe

हाथरसमधील घटनेचा वापर करून उत्तर प्रदेशात जातीय दंगली घडवण्याचा कट रचण्यात आला आहे. त्याद्वारे उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बदनाम करण्याचा डाव आहे, अशी खळबळजनक माहिती उत्तर प्रदेशातील सुरक्षा यंत्रणांच्या तपासात उघडकीस आली आहे. त्यामुळे हाथरसच्या बलात्कार घटनेला वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उघडकीस आलेल्या या माहितीवरून योगी आदित्यनाथ सरकारने भारतीय दंड संविधानाच्या २० विविध कलमांतर्गत हाथरस चंडपा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात ओपन एफआयआर दाखल केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधी पक्षांवर टीका करताना उत्तर प्रदेशात जातीय दंगली भडकावून विकासकामात अडथळा निर्माण करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचे म्हटले आहे. ज्यांना विकास नकोय त्यांना राज्य आणि देशात जातीय दंगली भडकावू इच्छित आहेत, असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

सुरक्षा यंत्रणांना जस्टीस फॉर हाथरसव्हिक्टिम.कार्ड. को – या अ‍ॅडरेसची वेबसाईट नव्याने स्थापन करण्यात आल्याचे आढळून आले. या वेबसाईटवर दंगल कशी भडकेल याची चर्चा केली जात असल्याचा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. तसेच या वेबसाईटवरून भडकावू लिखाण करण्यात येत असून जागोजागी निदर्शने, आंदोलने आणि हिंसाचार भडकवण्याचे आदेश देण्यात येत आहे, असेही सुरक्षा यंत्रणांनी सांगितले. या वेबसाईटवर बनावट आयडी तयार करून काही तासांतच हजारो लोक कनेक्ट झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -