मुंब्र्यात हजारो दलित, मुस्लिम मतदारांची नावे वगळली, आव्हाड निवडणूक आयोगाला करणार तक्रार

Offensive post from Minister Jitendra Awhad's fake Twitter account

मुंब्रा येथील दलित आणि मुस्लिम मतदारांची नावे ही मतदार याद्यांमधून गायब होण्याच्या मुद्द्यावर स्थानिक आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड प्रश्न उपस्थित केला आहे. जवळपास १० हजार ते १५ हजार नावे मतदार यातीतून गायब झाल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. मुख्यत्वे करून दलित आणि मुस्लिम समाजातील ही नावे आहेत. हे कोण करत ? व का करत ? असाही सवाल आव्हाड यांनी केला आहे. या प्रकरणात विविध यंत्रणांना बाब लक्षात आणून देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच मतदार याद्या आधार कार्डशी जोडण्याची मागणी त्यांनी केली आहे.

निवडणूक याद्या तपासल्या असत्या या याद्यांमध्ये मुंब्रा भागातील दलित आणि मुस्लिम मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात वगळण्यात आल्याची बाब आव्हाड यांनी मांडली आहे. या प्रकाराबाबत आव्हाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे मतदार यादीतून वगळण्याचे प्रकार कोण करत ? व का करत ? असाही सवाल त्यांनी केला आहे.

येत्या दिवसांमध्ये मी मतदार याद्यांमधून नाव वगळण्याचा प्रकार ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी, ठाणे, निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या निदर्शनास आणून देणार आहे. याची आपण गंभीर दखल घ्यावी. तसेच निवडणूकीच्या मतदार याद्या, ह्या आधार कार्डशी जोडल्या जाव्यात, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

आगामी दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पाहता राजकीय पक्षांनीही आपआपले मतदारसंघ बांधणीची सुरूवात केली आहे. निवडणूक आयोगानेही काही दिवसांपासून मतदार याद्यांमध्ये सुधारणेचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्यामुळेच अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये सुधारणा झालेली पहायला मिळत आहे. पण जितेंद्र आव्हाड यांच्या प्रश्नामुळे दलित आणि मुस्लिम मतदारांचा यादीतील नावाचा मुद्दा प्रामुख्याने समोर आला आहे. आता राज्य निवडणूक आयोग या प्रकरणात काय दखल घेणार हे येत्या दिवसात स्पष्ट होईल.


हेही वाचा – जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची गोपनीयता फुटली कशी?