घरताज्या घडामोडीमध्यप्रदेशनंतर राजस्थान काँग्रेस सरकार अडचणीत

मध्यप्रदेशनंतर राजस्थान काँग्रेस सरकार अडचणीत

Subscribe

राजस्थान सरकारमधील पेच : माकन, सुरजेवाला, पांडे यांना सोनियांनी राजस्थानला पाठवले

राजस्थानात काँग्रेसच्या गेहलोत सरकारला संकटाने घेरले असून मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामधील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी सक्रिय झाल्या आहेत. राजस्थानातील समस्या सोडवण्याच्या उद्देशाने सोनिया गांधी यांनी तीन नेत्यांना जयपूरला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

जयपूरला जाणार्‍या या नेत्यांमध्ये अजय माकन, रणदीप सुरजेवाला आणि अविनाश पांडे यांचा समावेश आहे. हे तीन नेते काँग्रेसच्या आमदारांशी चर्चा करतील. अजय माकन, रणदीप सुरजेवाला आणि अविनाश पांडे रविवारी रात्रीच जयपूरला रवाना झाले. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने सचिन पायलट यांनाही निर्देश देण्यात आले आहेत. सचिन पायलट हेही रविवारी रात्री जयपूरला पोहोचले. पायलट काँग्रेसच्या या तीन नेत्यांसोबत सोमवारी बैठक करतील त्यानंतर ते आमदारांच्या बैठकीत देखील भाग घेण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

ज्योतिरादित्य शिंदेही मैदानात

दरम्यान, काँग्रेसच्या या लढाईत भाजपाला फायदा होताना दिसत आहे. सचिन पायलट यांना आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. यासाठी भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे मैदानात उतरले आहेत. सचिन पायलट यांना बाजूला सारल्यामुळे मी दु: खी आहे, असे त्यांनी ट्विट ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले आहे. या परिस्थितीवरून काँग्रेसमध्ये कर्तृत्व आणि क्षमता काही महत्त्वाची नाही असे दिसत असल्याची टीकाही शिंदे यांनी केलीय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -