घरठाणेराजेश कदम निवडणुकीतील आमिषाला बळी पडले - राजू पाटील

राजेश कदम निवडणुकीतील आमिषाला बळी पडले – राजू पाटील

Subscribe

मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी आज मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले. या पार्श्वभूमीवर आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवलीसह अंबरनाथ, बदलापूरमधील अनेक पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर बोलताना गेल्या काही दिवसांपासून राजेश कदम यांच्या फेसबुक वॉलवरील पोस्ट संशयास्पद वाटत होत्या. परंतु ते राज ठाकरेंना मानणारे कट्टर सहकारी होते. कदाचित आगामी निवडणुकीतील आमिषाला बळी पडून त्यांनी पक्ष सोडला असावा, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली.

पुढे आमदार राजू पाटील म्हणाले की, दोनच दिवसांपूर्वी आम्ही राजेश कदम यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. तरीही कदम पक्ष सोडून का गेले याचे कारण आपल्याला समजत नाहीये. मात्र कदाचित त्यांची काही तरी अपरिहार्यता असावी किंवा निवडणुकीतील आमिषाला ते बळी पडले असावेत. मात्र एखाद्या व्यक्तीने पक्ष सोडल्यास पक्ष काही थांबत नसतो, तो उभारी घेत असतो. उद्या आम्ही सर्व राज ठाकरे यांची भेट घेणार असून याबाबत विश्लेषण करू. आमचे चुकले असते तर आम्ही माफी मागितली असती. मात्र ते माफी मागत आहेत याचा अर्थ त्यांची काही तरी अपरिहार्यता असावी. त्याही पलीकडे निवडणूक आली की साम दाम दंड भेद पद्धतीने आपल्या पदरात इतर पक्षातील लोकं घ्यायची हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू असल्याचेही आमदार पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisement -

बीजेपी सेना युती तुटलेली असल्याने इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पायाखालची जमीन सरकली असावी आणि त्यातून आमची माणसे फोडली असावीत. परंतु आगामी काळात याचा काही फरक पडेल असे अजिबात वाटत नसल्याचेही आमदार राजू पाटील यांनी यावेळी सांगितले.


हेही वाचा – डोंबिवलीत मनसेला मोठं खिंडार; शेकडो मनसे कार्यकर्त्यांच्या हाती शिवबंधन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -