घरक्राइमDrugs : गुजरात किनाऱ्याजवळ पाकिस्तानी बोटीत सापडले 600 कोटींचे ड्रग्ज; 14 जणांना...

Drugs : गुजरात किनाऱ्याजवळ पाकिस्तानी बोटीत सापडले 600 कोटींचे ड्रग्ज; 14 जणांना अटक

Subscribe

भारतीय तटरक्षक दलाने गुजरात किनारपट्टीवर एका पाकिस्तानी बोटीतून 600 कोटींचे 86 किलो ड्रग्ज जप्त केले

नवी दिल्ली : भारतीय तटरक्षक दलाने गुजरात किनारपट्टीवर एका पाकिस्तानी बोटीतून 600 कोटींचे 86 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. याप्रकरणी बोटीतून 14 जणांना अटक करण्यात आली असून अरबी समुद्रातील ही कारवाई भारतीय तटरक्षक दल, गुजरात दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) यांनी संयुक्तपणे केली. मात्र पाकिस्तानी बोटीतून कोणते ड्रग्ज जप्त करण्यात आले, हे तटरक्षक दलाने अद्याप उघड केलेले नाही. (Drugs worth 600 crores found in Pakistani boat near Gujarat coast)

गेल्या दोन दिवसांपासून सुरक्षा यंत्रणा आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ भारतीय पाण्याच्या आत शोध मोहीम राबवत होती. सदर कारवाई करण्यासाठी तटरक्षक जहाजे आणि विमाने तैनात करण्यात आली होती. याशिवाय आयसीजी जहाज राजरतननही या कारवाईचा भाग होता. जहाजाच्या विशेष पथकाने संशयास्पद बोटीवर चढून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज असल्याची पुष्टी केली. मात्र कारवाईदरम्यान, तस्करांनी अटक टाळण्याच्या प्रयत्नात एटीएस अधिकाऱ्यांवर बोट घुसवण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारानंतर पाकिस्तानी बोटीसह त्यामधून प्रवास करणाऱ्या 14 सदस्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सर्व आरोपींना पोरबंदर येथे आणण्यात येत आहे. विशेष म्हणजे सर्व आरोपी पाकिस्तानी आहेत.

- Advertisement -

दरम्यान, गुजरात आणि राजस्थानमध्ये मेफेड्रोन या औषधाची निर्मिती करणाऱ्या चार युनिटवर छापे टाकून 13 जणांना अटक करण्यात आली आहे. अहमदाबादचे मनोहर लाल एनानी आणि राजस्थानचे कुलदीपसिंग राजपुरोहित यांनी मेफेड्रोन तयार करण्यासाठी युनिट्स स्थापन केल्याची माहिती गुप्तचर एटीएसला मिळाली होती, यानंतर हा छापा टाकण्यात आला. गुजरात दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) यांनी गुप्तचर माहितीच्या आधारे शुक्रवारी (26 एप्रिल) या युनिट्सवर संयुक्तपणे छापा टाकला. या छाप्यात 230 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. एटीएसने 22 किलो (घन) मेफेड्रोन आणि 124 किलो लिक्विड मेफेड्रोन जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची किंमत सुमारे 230 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

फेब्रुवारीत सर्वात मोठी कारवाई (Biggest action in February)

दरम्यान, एनसीबी आणि हिंदुस्थानी नौदलाने फेब्रुवारी महिन्यात गुजरातच्या किनारपट्टीजवळ सर्वात मोठी कारवाई केली होती. या संयुक्त कारवाईत तब्बल 3 हजार 132 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. ज्याची किंमत जवळपास 1 हजार कोटींहून अधिक होती. नौदलाने याप्रकरणी जहाज ताब्यात घेऊन पाच जणांना अटक केली होती.

- Advertisement -

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -