घरक्राइमफरार आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेच्या पत्नीला अटक, महत्त्वाचे पुरावे लागले हाती

फरार आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेच्या पत्नीला अटक, महत्त्वाचे पुरावे लागले हाती

Subscribe

तर बऱ्हाटेला व्हिडिओ बनविण्यासाठी मदत केल्याच्या आरोपावरून आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.

जमीन व्यवहारात अनेकांची फसवणूक केलेल्या प्रकरणी मोक्का कायद्यातंर्गत गुन्ह्यातील फरार आरोपी माहिती अधिकारी कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याच्या पत्नीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. फरारी बऱ्हाटे हा पत्नीच्या संपर्कात असल्याचे तपासातून निष्पन्न झाले होते. त्यामुळेच त्याची पत्नी संगीता रवींद्र बऱ्हाटे हिला ( वय ४९. धनकवाडी) अटक करण्यात आली. तर बऱ्हाटेला व्हिडिओ बनविण्यासाठी मदत केल्याच्या आरोपावरून आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.

हडपसर पोलिस ठाण्यात सुमंत रंगनाथ देठे (वय ५८, रा. मांजरी ग्रीन, मांजरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संगीता रवींद्र बऱ्हाटे हिला करण्यात आली तर या गुन्ह्यातील आरोपी सचिन गुलाब धिवार याचा भाऊ पितांबर गुलाब धिवार यांनाही अटक झाली आहे. रवींद्र बऱ्हाटे फरारी झाल्यापासून हे त्याच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. विविध कलमांसह महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार दाखल गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच रवींद्र बऱ्हाटेसह पत्रकार देवेंद्र जैन, संजय भोकरे, बडतर्फ पोलिस शैलेश जगताप आणि परवेझ शब्बीर जमादार याच्यांसह १३ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

रवींद्र बऱ्हाटेच्या संपर्कात राहून अनेक कट कारस्थानात सहभागी झाल्याच्या आरोपावरून ही अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर संगीता हिला चौकशीसाठी बुधवारी दुपारी तिच्या धनकवडी येथील राहत्या घरातून गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. तिच्याकडे रात्री उशिरापर्यंत सखोल चौकशी केल्यानंतर प्रकरणात तिचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली.

फरार रवींद्र बऱ्हाटेने काही दिवसांपूर्वी बऱ्हाटेने सोशल मीडियावर अकरा व्हिडिओ प्रसारित केले होते. त्या व्हिडिओंमध्ये बऱ्हाटेने साक्षीदार, तक्रारदार, तपास अधिकारी यांच्यावर दबाव आण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच विविध आरोप केले होते. हे सर्व व्हिडिओ तयार करण्यासाठी पितांबर याने त्याला मदत केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -