घरमनोरंजन..आणि कोर्टातच झाला डिंपलचा हॅप्पी बर्थडे

..आणि कोर्टातच झाला डिंपलचा हॅप्पी बर्थडे

Subscribe

टीव्हीवर झळकण्यापुर्वी अस्मिताने म्युझिक,व्हि़डीओ, नाटकं आणि शॉर्टफिल्म्समध्येही देखील अभिनयाची छाप उमटवली.

 

झी मराठीवरील ‘देवमाणूस’ (Devmanus) हि मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. दिवसेंदिवस मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्टमुळे मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राने रसिक प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. तसेच प्रत्येक भूमिकेमध्ये कलाकारांनी आपल्या अभिनयाने चार चाँद लावले असे म्हणायला हरकत नाही.नुकताच या मालिकेतील ‘डिंपल’ हि भूमिका साकारणारी अभिनेत्री अस्मिता देशमुख (Asmeeta Deshmukh) हिचा वाढदिवस सेटवर साजरा करण्यात आला.कोरोना, लॉकडाऊन आणि चित्रीकरण सुरु असल्याने अस्मिताच वाढदिवस ‘देवमाणूस’ मालिकेच्या संपुर्ण टिमने सेटवर मजेशीर अंदाजात साजरा करत अस्मिताला सप्राइझ दिलं आहे. मालिकेत सध्या कोर्टाच्या सिक्वेन्सवर चित्रीकरण सुरु आहे. मालिकेतील मुख्य कथानक डॉ. अजितकुमार देव उर्फ देवी सिंग याला शिक्षा देण्यासाठी एसीपी दिव्या आणि वकील आर्या दोघेही कसोशीने प्रर्यत्न करताना दिसत आहे. याचदरम्यान मालिकेच्या संपुर्ण टिमने ‘डिंपल’ अर्थात अभिनेत्री अस्मिता देशमुख हिच्या वाढदिवसानिमित्ताने सेटवर लहानसं सप्राइज सेलिब्रेशन प्लॅन करत,कोर्टाच्या सेटअप असलेल्या या सेटवरच तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ‘देवमाणूस’ मालिकेची संपूर्ण टीम या पार्टीमध्ये सामील झालेली दिसत आहे.

- Advertisement -

‘देवमाणूस’ या मालिकेमधून मराठी प्रेक्षकांच्या घराघऱात पोहोचलेली अभिनेत्री अस्मिता देशमुखने आपल्या सहज सुंदर अभिनयाने लोकांना भूरळ पाडली. अस्मिताचा अभिनेत्री बनण्याचा प्रवास म्हणावा तितकासा सोपा नव्हता यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली आहे.अस्मिताचा जन्म पुण्यातील देहू या ठिकाणी झाला.हुजूरपागा गर्ल्स हायस्कूलमधून तिने शिक्षण पूर्ण केलं.अस्मिताला सुरूवातीपासूनच अभिनयाची आवड होती. इतकेच नाही तर तिला गायनाचा देखील छंद आहे.टीव्हीवर झळकण्यापुर्वी अस्मिताने म्युझिक,व्हि़डीओ, नाटकं आणि शॉर्टफिल्म्समध्येही देखिल अभिनयाची छाप उमटवली.

- Advertisement -


हे हि वाचा – रणवीरच्या अतरंगी स्टाईलवर होताहेत भन्नाट मीम व्हायरल



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -