घर क्राइम Pune Crime : पुण्यात पाच अल्पवयीन मुलांनी केली तरुणाची हत्या; कारण वाचून...

Pune Crime : पुण्यात पाच अल्पवयीन मुलांनी केली तरुणाची हत्या; कारण वाचून बसेल धक्का

Subscribe

पाच अल्पवयीन मुलांनी एका 26 वर्षीय तरुणाची हत्या केली आहे. अतिशय क्षुल्लक कारणावरून या तरुणाची हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. हडपसरमधील रामटेकडी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री एक ते तीनच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती आहे. महादेव रघुनाथ मोरे ( वय, 26 रा. काळेपडळ, हडपसर ) असे मृत तरुणाचे नाव आहे. वानवाडी पोलिसांनी याप्रकरणामध्ये 5 अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. पुण्यातून दररोज कोणत्या ना कोणत्या गुन्ह्याची माहिती समोर येत असते. कोयता गँगची दहशत तर पुण्यात आहेच. सोबतच अनेक खुनाच्या बातम्याही कानांवर पडत असतात. आता अशीच एक खुनाची बातमी समोर आली आहे. पाच अल्पवयीन मुलांनी एका 26 वर्षीय तरुणाची हत्या केली आहे. अतिशय क्षुल्लक कारणावरून या तरुणाची हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. हडपसरमधील रामटेकडी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री एक ते तीनच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती आहे. महादेव रघुनाथ मोरे ( वय, 26 रा. काळेपडळ, हडपसर ) असे मृत तरुणाचे नाव आहे. वानवाडी पोलिसांनी याप्रकरणामध्ये 5 अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime Five minors killed a youth in Pune the reason you will be shocked to read it)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव आणि अल्पवयीन 5 मुलं एकमेकांना आधीपासून ओळखत होते. यातील एक मुलगा शाळेत शिक्षण घेत आहे. तर इतर मुले रोजदारीने काम करून आपलं पोट भरतात. तर हत्या झालेला महादेव हा एक खासगी कंपनीत कामाला होता.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी ही सर्व मुलं आणि महादेव भेटले. त्यावेळी किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. मुलांना या गोष्टीचा राग आला. त्यांनी आपल्या मनात राग धरत पुन्हा महादेवची भेट घेतली. यावेळी हे सर्वजण रामटेकडी परिसरातील ढेरे कंपनीजवळ डोंगरावर मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी गेले. तिथे त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वादाचं रुपांतर हाणामारीत होऊन मुलांनी त्याला मारहाण करत दगडाने ठेचलं आणि हत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वीदेखील अशीच हत्या झाली होती 

काही दिवसांपूर्वी पुण्यात अशीच एक हत्या करण्यात आली होती. शिवाजीनगर परिसरातील मंगला चित्रपटगृहाबाहेर ‘गदर-2’ चित्रपट पाहून बाहेर पडलेल्या एका तरुणाची दहा ते बारा जणांनी तलवार आणि कोयत्याने वार निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नितीन मोहन मस्के असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: सर्वतीर्थ टाकेद देवस्थान येथे भरदिवसा अंधश्रद्धेचा प्रकार; घटनेमुळे खळबळ)

- Advertisment -