घरक्राइमTriple Murder: कुऱ्हाडीने सपासप वार करत मुलींसह पत्नीलाही संपवलं; चंद्रपूर हादरलं

Triple Murder: कुऱ्हाडीने सपासप वार करत मुलींसह पत्नीलाही संपवलं; चंद्रपूर हादरलं

Subscribe

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या मौशी गावात बापाने आपल्या दोन मुलींसह पत्नीवर कुऱ्हाडीने सपासप वार करत त्यांना संपवलं आहे. या तिहेरी हत्याकांडानं मात्र संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या हत्याकांडामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. (Triple Murder Killed his wife along with his daughters with an axe Chandrapur shook)

गाढ झोपेत असलेल्या दोन मुली आणि पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मौशी गावात घडली. या तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला आहे. अल्का तलमले ( वय 40) तेजू तलमले, प्रणाली तलमले अशी मृतांची नावं आहेत. तर आरोपी अंबादास तलमले (वय 50) याला पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

झोपेत असताना अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्या तिघीही सावरू शकल्या नाहीत. कोणताही प्रतिकार करू शकल्या नाहीत. आरोपीने केलेल्या हल्ल्यात पत्नी अलका, मुलगी तेजू आणि प्रणाली या तिघांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलीस घटनास्थळी पोहोचत आरोपीला अटक केली आहे. या तिहेरी हत्याकांडाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन हे घटनास्थळी पोहोचले आहेत. पुढील तपास नागभीड पोलीस करत आहेत.

(हेही वाचा: Loksabha 2024: …तर देशात असंतोष भडकेल; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली भीती)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -