घरदेश-विदेशपाकमध्ये गेलेले १०० काश्मिरी तरुण बेपत्ता

पाकमध्ये गेलेले १०० काश्मिरी तरुण बेपत्ता

Subscribe

सीमेपलीकडे दहशतवाद्यांचे स्लीपरसेल म्हणून युवक कार्यरत असल्याची शंका

पाकिस्तानात अल्पकालीन अधिकृत व्हिसा घेऊन गेलेले सुमारे १०० युवक गेल्या तीन वर्षात एक तर परत आले नाहीत अथवा त्यानंतर ते बेपत्ता झाले आहेत.

या प्रकारामुळे सीमेपलीकडे दहशतवाद्यांचे स्लीपरसेल म्हणून कार्यरत असल्याची शंका व्यक्त होत आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांपुढील आव्हान वाढले आहे. याबाबतच्या धोक्याची जाणीव गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात झाली होती. हंडवारा येथे पाच दहशतवाद्यांच्या एका गटाला चकमकीत कंठस्नान घातले होते. त्यातील एक जण हा स्थानिक युवक होता. तो 2018 मध्ये पाकिस्तानला गेला होता. तेथून परत आला नव्हता, असे सुरक्षा यंत्रणांच्या अनेक अधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -