घरदेश-विदेश१०७ वर्षांचे केवल कृष्ण यांनी घेतली कोरोना लस; ठरली देशातील पहिली वयस्क...

१०७ वर्षांचे केवल कृष्ण यांनी घेतली कोरोना लस; ठरली देशातील पहिली वयस्क व्यक्ती

Subscribe

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत संविधान लिहिण्यास महत्त्वपूर्ण सहभाग

भारतीय संविधान सभेच्या मसुदा समितीचा सदस्य असलेल्या १०७ वर्षीय केवल कृष्णा यांना सोमवारी कोविड -१९ लसीचा पहिला डोस देण्यात आला. त्यांचा मुलगा अनिल कृष्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९१८ मध्ये पसरलेल्या प्राणघातक स्पॅनिश फ्लू दरम्यान कृष्णा हे केवळ पाच वर्षांचे होते. केवल कृष्णा यांचा जन्म जालंधर जिल्ह्यात करतारपूर येथे ४ ऑगस्ट १०१३ रोजी झाला आहे.

केवल कृष्णा यांचा मुलाने असेही सांगितले की, मार्च २०२ मध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्यानंतर ते प्रथमच लसीकरणासाठी दक्षिण दिल्लीतील निवासस्थानाबाहेर पडले. ते म्हणाले, “लॉकडाऊन झाल्यापासून आम्ही त्यांना घरी सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला होता.” आज आम्ही त्यांना रुग्णालयात कोविड -१९ ची लस देण्यासाठी घेऊन आलो आहोत, जिथे २०१९ मध्ये कृष्णा यांचे ऑपरेशन झाले होते. लसीकरणानंतर त्यांना सुखरूप घरी नेण्यात आले. कृष्णा यांनी कोरोनाची लस घेतल्यानंतर त्यांना कोणताही त्रास जाणवला नाही त्यांची तब्येत उत्तम असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर होत असून परिस्थिती चिंताजनक असल्याचे दिसतेय. दरदिवशी कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होताना असताना कोरोना लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसतेय. देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू असून लसीकरण मोहिमेंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा प्रयत्न आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, सोमवारी भारतात कोरोनाचे २६ हजार २९१ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ११८ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यांनी अशीही माहिती दिली की, देशात आतापर्यंत १ लाख ५८ हजार ७२५ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -