घरदेश-विदेशकुमारस्वामींची खुर्ची धोक्यात; कर्नाटकात ११ आमदारांचा राजीनामा

कुमारस्वामींची खुर्ची धोक्यात; कर्नाटकात ११ आमदारांचा राजीनामा

Subscribe

कर्नाटकात ११ आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे तेथील राजकीय परिस्थितीबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे.

कर्नाटकात अचानक ११ आमदारांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यामध्ये काँग्रेसचे ८ तर जेडीएसचे ३ आमदारांचा समावेश आहे. या सर्व आमदारांनी कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष रमेश कुमार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. परंतु, या विषयावर बोलण्यास कुमार यांनी नकार दिला आहे. आपण या विषयावर सोमवारीच बोलू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या राजकीय भूकंपानंतर देशभरात कर्नाटकमधील राजकीय परिस्थितीबाबत जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

कुमारस्वामींची खुर्ची धोक्यात

कर्नाटक सरकारमधील ११ आमदारांनी अचानक त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची धोक्यात येण्याची शक्यता आहे. २०१८ साली कर्नाटकात विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या होत्या. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि जनता सेक्यूलर दल (जेडीएस) यांच्यात रस्सीखेच स्पर्धा झाली होती. भाजपने या निवडणुकीत २२४ पैकी सर्वाधिक अशा १०४ जागा मिळवल्या. मात्र, बहुमत असूनही भाजपला सत्तेपासून वंचित राहावे लागले. हीच बाब भाजपच्या पचनी पडली नाही. त्यामुळे भाजप वारंवार काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांना पळवण्याचा प्रयत्न करत आहे.

- Advertisement -

कुमारस्वामी विदेशात असताना दिले राजीनामे 

बीबीसी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आमदारकीचा राजीनामा देणाऱ्यांमध्ये बी. सी. पाटील, एच. विश्वनाथ, नारायण गौडा, शिवराम हेब्बार, महेश कुमाथल्ली, गोपालय्या, रमेश जारकीहोळी, प्रताप गौडा पाटील या आमदारांचा समावेश आहे. या अगोदरही भाजपने काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांना पळवण्याचा प्रयत्न केला होता. भाजपने या आमदाराला मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये चर्चेसाठी बोलावले होते. मात्र, भाजपचा तो प्रयत्न देखील फसला होता. सध्या कुमारस्वामी अमेरिकेच्या वैयक्तिक दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या पाठीमागे ११ आमदारांनी आपला राजीनामा दिला आहे.

राजीनाम्यांशी आमचा काहीच संबंध नाही – भाजप

दरम्यान, भाजपने या राजीनाम्यांशी आपला काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. दोन पक्षांच्या अंतर्गत मतभेदांमुळे ११ आमदारांनी राजीनामा दिल्याचे एका भाजप नेत्याने म्हटले आहे. याशिवाय ‘जर ते स्वत:हून राजीनामा देत असतील, तर त्यासोबत आणचं काहीही देणंघेणं नाही. जर सगळं अपक्षेनुसार घडलं तर आम्ही आमचं सरकार स्थापन करु’, असेही ते म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -