घरमनोरंजनकंगनाचा ‘धाकड’लूक प्रदर्शित; अॅक्शन करताना दिसणार बॉलिवूडची क्वीन

कंगनाचा ‘धाकड’लूक प्रदर्शित; अॅक्शन करताना दिसणार बॉलिवूडची क्वीन

Subscribe

अॅक्शन करताना दिसणार बॉलिवूडची क्वीन

बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंगना रणौत आपल्या जजमेंटल है क्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर ती चर्चेत आली होती. ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातील दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर आता कंगनाने आपल्या चाहत्यांना एक सरप्राइज दिला आहे. तिच्या आगामी अॅक्शन चित्रपटातील लूक नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे नाव ‘धाकड’असून यामध्ये कंगना अॅक्शन सीन करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने हे पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटातील अॅक्शन सीन चित्रीत करण्यासाठी हॉलिवूडचे अॅक्शन दिग्दर्शक येणार असल्याचेही त्याने सांगितले आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या या आजूबाजूला लागलेली आग आणि कंगना हातात बंदूक घेऊन उभी असल्याचे या पोस्टरमध्ये दिसत आहे. या पोस्टरमध्ये कंगनाचा अर्धा चेहरा दिसत आहे. तिच्या मागच्या चारही बाजूला आग दिसून कंगना यामध्ये अॅक्शन करतांना प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

- Advertisement -

या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनिश घई करणार असून सोहेल मकलाई हे याची निर्मिती करणार आहेत. पुढच्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होईल. त्यापूर्वी येत्या २६ जुलै रोजी कंगनाचा ‘जजमेंटल है क्या’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यामध्ये कंगनासोबत राजकुमार रावची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाचे शुटिंग देशासह विदेशातील अनेक ठिकाणी करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -