घरदेश-विदेशLive In Relationship: हायकोर्टाचा मोठा निर्णय, १९ वर्षाच्या तरुणालाही 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये...

Live In Relationship: हायकोर्टाचा मोठा निर्णय, १९ वर्षाच्या तरुणालाही ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचा अधिकार

Subscribe

न्यायालयाचे पोलिस सुरक्षा देण्याचे निर्देश 

लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. एका प्रकरणात १९ वर्षीय तरुणाला त्याच्या ३१ वर्षीय प्रियसीसह लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचा अधिकार असल्याचे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने म्हटले आहे. सज्ञान प्रेमी युगल एकत्र राहू शकतात असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.यातील याचिकाकर्त्या मुलाचे वय सध्या १९ वर्षे असून हे वय विवाह योग्य नसले तरी २१ वर्षानंतर तो आपल्या प्रियसीसह विवाह करण्यास इच्छूक असल्याचे त्याने न्यायालयात म्हटले आहे.

विवाहासाठी मात्र हे वय अमान्य

१८ वर्षाहून अधिक वय असल्याने हा तरुण सज्ञान असला तरी त्याचे वय विवाहासाठी वैध्य नाही. मात्र याचा आधार घेत त्याला आपल्या प्रियसी किंवा पार्टनरसह राहण्यासाठी रोखणे योग्य नाही. त्यामुळे दोघांनाही एकमेकांसह लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचा अधिकार असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यालयाच्या एकल पीठाचे न्यायमूर्ती अरुण कुमार त्यागी यांनी हा निर्णय दिला आहे. याचिकर्ते सज्ञान असून त्यांना एकत्र लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे न्यायमूर्तींनी नमूद केले.

- Advertisement -

न्यायालयाचे पोलिस सुरक्षा देण्याचे निर्देश 

याचिकर्त्या तरुणानं आपल्या प्रियसीसह राहतो. या प्रियसीसह त्याला प्रेम विवाह करायचा आहे, मात्र विवाहासाठी आवश्यक अधिकृत कागदपत्रे प्रियसीच्या घरीच असल्याने कायदेशीर विवाह करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. यातच प्रियसीच्या कुटुंबियांकडून दोघांच्याही जीवाला धोका असल्याने दोघांनीही मोहाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यावर न्यायालायाने आता या दोन्ही प्रेमी युगलांची सुरक्षा आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना सुरक्षा देण्याचे निर्देश दिले आहेत.

याचिकर्त्या तरुणाच्या प्रियसीला तिच्या कुटुंबियांकडून सतत दुसऱ्या व्यक्तीसह विवाह करण्याची जबरदस्ती केली जात आहे. यामुळे याचिकाकर्त्या तरुण आणि त्याच्या प्रियसीला जीवे मारण्याची धमकीही दिली जात आहे. असे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी दोघांनाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्र लिहित सुरक्षेची मागणी केली होती. मात्र यावर कोणताही कारवाई करण्यात आली नाही. ही बाब लक्षात घेत न्यायमूर्ती त्यागी यांनी पोलिसांना या दोन्ही प्रेमी युगलांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -