घरदेश-विदेशशाळेची भिंत कोसळून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

शाळेची भिंत कोसळून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Subscribe

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. त्यांनी गौतमबुध्दनगरचे जिल्हाधिकाऱ्यांना राहत आणि बचाव कार्य करण्याचे आदेश दिले आहेत

नोएडातील एका शाळेमध्ये आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. ज्यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. नोएडा सेक्टर – ४९ मध्ये असणाऱ्या प्ले स्कूलची अचानक भिंत कोसळली. या ढिगाऱ्याखाली अनेक विद्यार्थी अडकले. त्यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर अनेक विद्यार्थी जखमी झाले. न्यू केएम पब्लिक स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. त्यांनी गौतमबुध्दनगरचे जिल्हाधिकाऱ्यांना राहत आणि बचाव कार्य करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच जखमी विद्यार्थ्यांना ताबडतोब उपचार देण्यात यावे असे आदेश दिले.

- Advertisement -

शाळेच्या पुनर्बांधणी काम होते सुरु

नोएडाच्या सेक्टर ४९ मध्ये असणाऱ्या प्ले स्कूलची भिंत कोसळली. यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर ३ विद्यार्थी जखमी झाले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, शाळेमध्ये पुनर्बांधणीचे काम सुरु होते. तर शाळेच्या मागे माती भरण्याचे काम सुरु होते. यामध्येच मातीवर दाब पडला आणि मोठी दुर्घटना घडली. विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी सांगितले की, जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा विद्यार्थ्यांची परिक्षा सुरु होती. दुर्घटना घडली तेव्हा शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना पेपर देत होते. ही शाळा भाड्याच्या बिल्डिंगमध्ये चालवली जात होती.

आरोपींना लवकरच करणार अटक

घटनेची माहिती मिळताच डीएम बीएन सिह, एसएसपी डॉ. अजयपाल शर्मा, एसपी सिटी सुधा सिंह, एसडीएम निरंजन कुमार, एनडीआरएफची टीम तसंच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या ५ विद्यार्थ्यांपैकी २ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर ३ जणांवर उपचार सुरु आहे. याप्रकरणाचा तपास सुरु असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल अशी माहिती एसएसपी यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -